शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘एपीएमसी’ची निवडणूक पुढे का ढकलली? हायकोर्टाचा परखड सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:08 IST

कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती(एपीएमसी)ची निवडणूक पुढे का ढकलली, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देउत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती(एपीएमसी)ची निवडणूक पुढे का ढकलली, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.बाजार समितीची निवडणूक घेण्यासाठी २०१८ पासून वारंवार आदेश देण्यात आले. परंतु, ही निवडणूक अद्याप झाली नाही. त्यातच राज्य सरकारने अधिसूचना जारी करून ही निवडणूक जानेवारी-२०२१ पर्यंत पुढे ढकलली. तसेच, प्रशासकालाही हटविण्यात आल्यामुळे सध्या समितीचे सचिव व्यवस्थापन सांभाळत आहेत. या परिस्थितीमुळे जुन्या निर्वाचित कार्यकारी मंडळाला समिती सांभाळण्याची परवानगी देणे आवश्यक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले. राज्य सरकारने पुढच्या तारखेपर्यंत उत्तर सादर करावे. त्यानंतर उत्तराकरिता वेळ वाढवून मिळणार नाही, अशी तंबीदेखील न्यायालयाने दिली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात अहमदभाई करीमभाई शेख यांनी याचिका दाखल केली आहे. समितीची नवीन निवडणूक होतपर्यंत जुन्या निर्वाचित कार्यकारी मंडळाला समिती सांभाळण्याची परवानगी देण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने १६ जानेवारी २०१८ रोजी समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर निवडणूक घेण्यासाठी सरकारच्या विनंतीवरून २७ सप्टेंबर २०१९ रोजी तीन महिने तर, २४ जानेवारी २०२० रोजी सहा महिने वेळ वाढवून देण्यात आला. दरम्यान, राज्य सरकारने समितीची निवडणूक जानेवारी-२०२१ पर्यंत पुढे ढकलली. या घटनाक्रमामुळे सरकारची उदासीनता न्यायालयाच्या निदर्शनास आली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अजय घारे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती