शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विद्यापीठाला मराठीचा तिटकारा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:02 IST

ज्या मराठी भाषेबद्दल ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे म्हटले जाते. ज्या मराठी भाषेच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुखांकडे होते.

ठळक मुद्दे‘हायटेक’ होऊनही संकेतस्थळाची मराठी आवृत्ती ‘अपडेट’ नाही : अद्याप नऊ विद्याशाखा अस्तित्वात

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या मराठी भाषेबद्दल ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे म्हटले जाते. ज्या मराठी भाषेच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुखांकडे होते. ज्या मराठी भाषेचा सातासमुद्रापार डंका वाजत आहे, तिच्याबद्दल ‘हायटेक’ होत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ फारसे गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळ हे विद्यापीठाला सर्व जगाशी जोडणारे माध्यम आहे. मात्र ‘आॅनलाईन’ सुधारणांचे मोठमोठे दावे होत असले तरी संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीकडे अधिकाºयांचे साफ दुर्लक्ष होत आहे. संकेतस्थळावर अद्यापही जुनीच माहिती उपलब्ध असून काही अपवाद वगळता येथे ‘अपडेट’ करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही.‘ई-रिफॉर्म्स’साठी नागपूर विद्यापीठाने अनेक सकारात्मक पावले उचलली. परंतु ‘आॅनलाईन’ सुधारणाचे मूलभूत अंग असलेल्या संकेतस्थळाचा मात्र हवा तसा विकास झालेला नाही. अनेकदा तर संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीवर प्रशासनाच्या विविध अधिसूचना, परिपत्रके ‘अपलोड’च होत नसल्याचे आढळून आले आहे. यासंबंधात प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांना कधीही जाब विचारला जात नाही हे विशेष.अनेक विद्यार्थी विभागांची माहिती व्हावी यासाठी संकेतस्थळाचा आधार घेतात. परंतु बºयाच विभागांची सद्यस्थितीतील माहितीच उपलब्ध नाही. अनेक विभागांमध्ये तर २ ते ३ वर्षांअगोदरची माहिती दिसून येत आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर विद्याशाखांची संख्या ४ इतकी झाली आहे. मात्र संकेतस्थळावर अद्यापही सर्व कारभार नऊ विद्याशाखांना अनुसरुनच दाखविण्यात येत आहे. दुसरीकडे विद्यापीठाद्वारे संचालित करण्यात येत असलेल्या ‘एलआयटी’ तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची संकेतस्थळावरील ‘लिंक’च उघडत नाही. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजीची अडचण असते. त्यामुळे विविध माहिती मिळविण्यासाठी ते मराठी आवृत्तीची मदत घेतात.मात्र येथे चुकीची माहिती उपलब्ध आहे. यातूनच मराठी ‘आॅनलाईन’ सुधारणांचे मोठमोठे दावे करणाºया नागपूर विद्यापीठ संकेतस्थळाच्या बाबतीत अद्यापही हवे तसे प्रगत झालेले नाही हेच स्पष्ट होेत आहे.काणे, वंजारी अद्याप विभागप्रमुखचसंकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीकडे विद्यापीठाचे कसे दुर्लक्ष आहे, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे विविध विभागांबाबतची अपुरी व चुकीची माहिती. डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे गेल्या सव्वातीन वर्षांहून अधिकच्या काळापासून विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तर डॉ.शशीकला वंजारी यांची मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होऊन महिना उलटून गेला आहे. मात्र दोघेही अद्यापपर्यंत अनुक्रमे सांख्यिकीशास्त्र व पदव्युत्तर शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणूनच दर्शविण्यात येत आहेत.