शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाची फूटपट्टी शेतकऱ्यांसाठी का नाही ?

By admin | Updated: June 18, 2017 02:19 IST

कर्मचाऱ्यांसाठी सहावा, सातवा वेतन आयोग लागू केला जात आहे. आमचा या वेतन आयोगाला विरोध नाही.

विजय जावंधिया : पारतंत्रातील निकष स्वातंत्र्यानंतरही कायम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कर्मचाऱ्यांसाठी सहावा, सातवा वेतन आयोग लागू केला जात आहे. आमचा या वेतन आयोगाला विरोध नाही. परंतु ८ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणाऱ्या या वेतन आयोगाची फूटपट्टी १२ तास शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी का नाही, असा थेट प्रश्न शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थित केला. तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांनाही फूटपट्टी लावून त्यानुसार कृषीमूल्य आयोगाने भाव ठरवावे, असेही स्पष्ट केले. लोकशाही हक्क संरक्षण समितीच्यावतीने हिंदी मोरभवन येथील नटराज सभागृहात शनिवारी ‘शेतकरी आंदोलन : आव्हान आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेती विषयाचे अभ्यासक अमिताभ पावडे आणि अनंत भोयर प्रमुख अतिथी होते. विजय जावंधिया म्हणाले, इंग्रजांनी आपल्या काळात येथील नागरिकांना गुलाम ठेवण्यासाठी असंघटित नोकरदार व असंघटित कामगार, शेतकरी यांचे वेतन निश्चित करण्यासाठी एक पद्धत अवलंबिली होती. ती पद्धत आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही कायम आहे, असे का? शेतकऱ्यांचे प्रश्न हे या देशातील चुकीच्या आर्थिक धोरणांमध्ये लपलेले आहे. १९९० नंतर राबवण्यात आलेल्या आर्थिक धोरणामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठे नुकसान सोसावे लागले आहे. या चुकीच्या धोरणांविरुद्ध आपण आवाज उठवणार की नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे असतील तर त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अमिताभ पावडे म्हणाले, शेतकऱ्यांचे शोषण कसे होते, हे येथील राजकारण्यांनी सोप्या शब्दात शेतकऱ्यांना कधी समजावून सांगितलेलेच नाही. शाळांमधून शेती शिकवली जात नाही. शेतीचे अर्थशास्त्र सांगितले जात नाही. असे का? कारण ज्या क्षेत्रातील लोकांना गुलाम करायचे असते, त्या क्षेत्राबाबत लोकांना अज्ञानी ठेवले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. अनंत भोयर यांनी सोप्या शब्दात शेतकऱ्यांची व्यथा मांडली. कांदा हा २० रुपये किलोने विकला जातो. तेव्हा आयात करून त्याचे भाव पाडले जातात. परंतु तोच कांदा जेव्हा ५ रुपयाला विकला जातो तेव्हा निर्यात का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रास्ताविक व संचालन प्रज्ज्वला तट्टे यांनी केले. सुनील दुधे यांनी आभार मानले.