शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

खासगी लॅबला मुंबईत परवानगी नागपुरात का नाही? खा. डॉ. महात्मे यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:04 IST

‘कोव्हीड-१९’च्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मंजुरी नसल्याने फार कमी नमुने तपासले जात आहे. मुंबईत खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेवर असे निर्बंध नाहीत, नागपूरलाच परवानगी देण्यात का उशीर होतोय, असा प्रश्न पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देखासगी हॉस्पिटलमध्येही कोरोनाबाधितांवर उपचार व्हावेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात खासगी प्रयोगशाळांमध्येही जास्तीत जास्त संख्येत नमुने तपासणे आवश्यक आहे. परंतु आपल्याकडे यांना केवळ भरती रुग्णांचेच नमुने घेण्याची परवानगी आहे. बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांचे नमुने घेण्याची परवानगी नाही. यातही ‘कोव्हीड-१९’च्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मंजुरी नसल्याने फार कमी नमुने तपासले जात आहे. मुंबईत खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेवर असे निर्बंध नाहीत, नागपूरलाच परवानगी देण्यात का उशीर होतोय, असा प्रश्न पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार व्हायला हवेत, असे मतही मांडले.‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव’ या विषयावर ते ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, नागपुरात बुधवारी सायंकाळपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ९८ वर पोहचली होती. ही संख्या वाढत जाणारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांना (लॅब) कोरोनाची जास्तीत जास्त चाचणी करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे. मुंबईच्या तुलनेत नागपूरच्या मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळेवर काही निर्बंध घालण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत केवळ ३० नमुने तपासण्यात आले. प्रशासनाने हे निर्बंध शिथिल केल्यास याचा फायदा संशयित रुग्णांना होऊ शकतो. विशेष म्हणजे, ज्या रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये जाऊन नमुने देण्याची व तिथे दिवसभर थांबण्याची भीती वाटत असेल त्यांच्यासाठी या खासगी प्रयोगशाळा पर्याय ठरतील. या प्रयोगशाळा आयुष्यमान भारत योजनेशी जुळल्याने लाभार्थ्यांनाही याचा फायदा मिळेल. नागपुरात ८० टक्के रुग्णसेवा खासगीमधून तर केवळ २० टक्के रुग्णसेवा शासकीय रुग्णालयातून दिली जाते. असे असतानाही कोरोनाबाधित रुग्णांवर केवळ मेयो, मेडिकलमध्येच उपचाराची सोय आहे. स्वाईन फ्लू किंवा सार्स आजारात खासगी रुग्णालयांनाही उपचार करण्याची परवानगी आहे. त्याच धर्तीवर कोरोनाबाधितांवर उपचाराची सोय व्हायला हवी. विशेष म्हणजे, काही खासगी इस्पितळांमध्ये ‘एअर लॉक’ व ‘एअर निगेटिव्ह आयसोलेशन सिस्टीम’ आहे. रुग्णाच्या खोलीतील हवाही बाहेर पडताना निर्जंतुकीकरण होते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास खासगी हॉस्पिटलची मोठी मदत होऊ शकते. या रुग्णालयांनाही आयुष्यमान भारत योजनेशी जोडणे गरजेचे आहे.क्वारंटाइनचे कठोरतेने पालन आवश्यकचलोणारा येथील क्वारंटाइन असलेले संशयित इमारतीच्या छतावर एकत्र असल्याचे छायाचित्र ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. हे धक्कादायक आहे. असे जर क्वारंटाइनचे नियम धुडकावले जात असतील तर हेच अलगीकरण कक्ष प्रादुर्भावाचे केंद्र ठरेल. संशयितांना क्वारंटाइन यासाठी केले जाते कारण ते ‘हायरिस्क’ ग्रुपमधील आहेत. यामुळे क्वारंटाइन नियमांचे कठोरतेने पालन होणे आवश्यकच आहे.बोलूनही उपाययोजन नाहीतखासगी प्रयोगशाळेत तपासणीवरील निर्बंध दूर करून मुंबई प्रमाणेच नागपुरातही ती सोय उपलब्ध करून देण्यासाठी व खासगी हॉस्पिटलध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झाले. परंतु अद्यापही उपाययोजना केल्या नसल्याची खंतही खा. डॉ. महात्मे यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVikas Mahatmeविकास महात्मे