शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातच बस्तान कशासाठी?

By admin | Updated: June 19, 2015 02:36 IST

कारागृहात बसूनच खतरनाक गुन्हेगार बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांमार्फत खंडणी वसूल करू लागले.

निलंबित कांबळेंचे कारागृह परिसरातच ‘वैभव’!नागपूर : कारागृहात बसूनच खतरनाक गुन्हेगार बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांमार्फत खंडणी वसूल करू लागले. ऐषोआरामाच्या साऱ्याच सुविधा मिळत असल्याने गुन्हेगारांसाठी कारागृहाच्या आत-बाहेरचा फरकच उरला नाही. परिणामी नागपुरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली. दुसरीकडे कारागृहातील गुन्हेगार कमालीचे निर्ढावले. त्यांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ‘जेल ब्रेक’ घडवून आणले. ३१ मार्चच्या पहाटे पाच खतरनाक गुन्हेगार कारागृहातून पळून गेले. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत सर्वप्रथम कारागृह अधीक्षक वैभव कांबळेंना निलंबित केले. त्यानंतर पाच कर्मचारी आणि चार अधिकारी आणखी निलंबित झाले. एका कर्मचाऱ्याला सेवेतूनच बडतर्फ करण्यात आले. सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली.या समितीने सरकारला काय अहवाल दिला ते कळायला मार्ग नाही. मात्र, निलंबित कांबळेची उर्मटगिरी अद्याप सुरूच असल्याचे पुन्हा एका उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. कांबळे यांना सरकारने निलंबित करून आज ७९ दिवसांचा कालावधी झाला. मात्र, कांबळेचे बस्तान हलले नाही. वरिष्ठ पातळीवरून झालेल्या चौकशीत काही गंभीर गैरप्रकार अधोरेखित झाल्यामुळे कांबळेचे मुख्यालय स्थानांतरित करण्याची तयारी झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, कारागृह प्रशासन आणि गृह खात्यातील वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानुसार कांबळेंना कोल्हापूर मुख्यालय देण्यात आले. या निर्णयाच्या आदेशाला आता १० ते १५ दिवस झाले आहे. मात्र, कांबळेंनी हा आदेश मानण्यास नकार दिल्याचे समजते. त्यांनी कोल्हापूरला जाण्याऐवजी आपले बस्तान नागपुरातच ठेवले आहे. (प्रतिनिधी)