शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सतीश उकेंना शोधण्यासाठी वेळ का लागतोय?

By admin | Updated: June 15, 2017 02:09 IST

वादग्रस्त वकील सतीश उके यांना शोधण्यासाठी वेळ का लागतोय, असा सवाल मुंबई

हायकोर्टाने फटकारले : पोलिसांवर ताशेरे ओढण्याची तंबी दिली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वादग्रस्त वकील सतीश उके यांना शोधण्यासाठी वेळ का लागतोय, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उपस्थित करून पोलिसांना कडक शब्दांत फटकारले. तसेच, येत्या २२ जूनपर्यंत ठोस उत्तर न मिळाल्यास आवश्यक आदेश जारी करून पोलिसांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढण्यात येतील, अशी तंबी दिली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी उच्च न्यायालयाने उके यांना न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा करावास, अशी शिक्षा सुनावली. परंतु, उके त्यापूर्वीपासूनच अज्ञात ठिकाणी लपून बसले आहेत. त्यामुळे या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही. उके यांना पकडून गजाआड करण्यासाठी वॉरंट जारी करण्यात आला आहे. प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सरकारी वकील केतकी जोशी यांनी उके यांना शोधण्याचा पोलीस पूर्ण प्रयत्न करीत असून त्यांची योजना सध्यास जाहीर करता येणार नाही, असे न्यायालयाला सांगितले व उके यांना शोधण्यासाठी आणखी काही दिवस वेळ देण्याची विनंती केली. परंतु, आधीच पुरेसा वेळ देण्यात आल्यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन पोलिसांची खरडपट्टी काढली. आतापर्यंतची परिस्थिती पाहता उके यांना शोधण्यास पोलीस असक्षम ठरत आहे, हे दिसून येत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. जोशी यांनी आग्रहाची विनंती केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना २२ जूनपर्यंत वेळ वाढवून दिला. जगताप यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई उके यांच्यासाठी अवैधपणे कार्य करणारे अ‍ॅड. व्ही. डी. जगताप यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने न्यायालयाच्या निर्देशावरून समिती स्थापन केली आहे. कौन्सिलने ही माहिती बुधवारी न्यायालयाला देऊन कारवाई पूर्ण करण्यासाठी २१ जूनपर्यंत वेळ वाढवून घेतली. जगताप यांनी स्वत:च्या स्वाक्षरीचा वकालतनामा न जोडता उके यांचे दोन अर्ज न्यायालयात दाखल केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीस तामील होऊनही ते न्यायालयात हजर झाले नाही. परिणामी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश कौन्सिलला दिले होते. अन्य वकील आर. एस. काकड यांनी न्यायालयात क्षमापत्र सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली.