नागपूर : परदेशी कंपन्या भारतात येऊन उत्तम मार्केटिंग करतात आणि जसे काही ते भारताचेच हित बघतात, असे भासवण्यास उजवे ठरतात. भारतीय ग्राहक ‘अरे ही तर आपलीच’ असे म्हणून आनंदीही होतात. मात्र, असते उलट. एका अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीने असाच फंडा वापरून भारतीयांना वेड लावले आहे. चिनी वस्तूंचा बहिष्कार सुरू झाला तेव्हा त्या बहुराष्ट्रीय ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीविषयी ती कंपनी चिनी असल्याचा प्रसार केला जात होता. तेव्हा त्या कंपनीने ‘अपने *** पे’ अशा आशयाची जाहिरात करण्यास सुरुवात केली आणि भारतीय ग्राहकांना ठासवून देण्यात यशस्वीही झाली. मात्र, त्याच तुलनेत काही भारतीय कंपन्या माघारी पडताना दिसत आहेत. ही बाब वेगळी की बहुराष्ट्रीय कंपनीकडे अमाप पैसा आहे आणि त्याच भरवशावर ते ग्राहकांना भूल पाडण्यास सक्षम आहेत. मात्र, आपल्या कंपन्या हे फंडे कधी स्वीकारणार असा प्रश्न प्रकाश चोपडा यांनी उपस्थित केला आहे.
................