महापौर जिचकार, जोशींनी सुनावले शेळके यांच्या उपोषणाची सांगतानागपूर : न्याय मागण्यासाठी लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. परंतु आंदोलनाच्या आडून भाजपा नेत्यांना शिविगाळ केली जात असेल. त्यांच्याबाबत अपशब्द वापरून त्यांचा अनादर केला जात असेल तर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांचे उपोषण सोडवायला आम्ही का यायचे, असा रोखठोक सवाल करीत महापौर नंदा जिचकार व सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी गुरुवारी काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना सुनावले.ओसीडब्ल्यू, एसएनडीएल व कनक रिसोर्सेसच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून शेळके यांनी महाल येथील गांधी गेटजवळ उपोषण सुरू केले होते. मात्र, या आंदोलनाला सत्ताधारी एकाही पदाधिकाऱ्याने भेट दिली नाही. एकही अधिकारी फिरकला नाही. आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. गुरुवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकुब झाल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक प्रपुल्ल गुडधे हे महापौर नंदा जिचकार यांच्या कक्षात गेले. तेथे त्यांनी जिचकार व सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांना बंटी शेळके यांच्या उपोषण मंडपाला भेट देण्याची विनंती केली. मात्र, महापौर जिचकार व जोशी यांनी सपशेल नकार दिला. आंदोलन करण्यासंदर्भात शेळके यांनी महापौर किंवा आयुक्तांना कोणत्याही प्रकारचे निवेदन दिलेले नाही. उपोषण आम्ही का सोडवायचे ?मागण्यासंदर्भात चर्चाही केली नाही, असे जोशी यांनी गुडधे यांच्या निदर्शनास आणले. मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांचा आंदोलकांच्या मागण्यांशी कोणताही संबंंध नाही. असे असतानाही शेळके यांच्या कार्यक र्त्यांनी कुंभारे यांच्या घरापुढे निदर्शने केली. मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. हा प्रकार कितपत योग्य आहे, असा सवाल जोशी यांनी केला. शेळके यांनी एसएनडील, कनक रिसोर्सेस व ओसीडब्ल्यू यांच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. यातील एसएनडीएलचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. कनक रिसोर्सेचा कंत्राट वर्षभरात संपत आहे. ओसीडब्ल्यूच्या विषयावर सभागृहात वेळोवेळी चर्चा होत असल्याचे जोशी यांनी निदर्शनास आणले. यावर गुडधे म्हणाले, भाजपा कार्यकर्तेही काँग्रेस नेत्यांवर आरोप करीत असतात. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र महापौर कुठल्या पक्षाचा नसतो. त्यामुळे त्यांनी शेळके यांचे उपोषण सोडवावे. परंतु महापौरांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गुडधे यांना परतावे लागले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, माजी महापौर प्रवीण दटके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अखेर आयुक्तांनी सोडवले उपोषण महापौरांनी नकार दिल्यानंतर काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊ न त्यांना शेळके यांचे उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानतंर काही वेळाने हर्डीकर उपोषण मंडपात पोहचले, त्यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू शरबत देऊ न उपोषण सोडले. मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांंनी दिले. विशेष म्हणजे हर्डीकर यांना याच मार्गाने महापालिका मुख्यालयात जायचे होते. तर पुन्हा आंदोलन : शेळके आयुक्तांच्या आश्वासनानुसार आंदोलन मागे घेत आहोत. परंतु मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात पुन्हा आंदोलन करू, असा इशारा बंटी शेळके यांच्यासह प्रशांत तन्नेरवार, शाहीद खान, वसीम शेख आदी उपोषणकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शेळके यांचे उपोषण सोडविले त्यावेळी माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, तानाजी वनवे, दुनेश्वर पेठे, जीशान मुमताज, हर्षला साबळे, प्रणिता शहाणे, हरीश ग्वालबंशी, नितीन साठवणे, नेहा निकोसे, दर्शनी धवड, सैयदा बेगम, सामाजिक कार्यकर्ते रामजी घोडे, संदीप सहारे, जुल्फेकार भुट्टो, ममता सहारे, मनोज गावंडे, पुरुषोत्तम हजारे, आभा पांडे, दिनेश यादव, आशा उईके यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपोषण आम्ही का सोडवायचे ?
By admin | Updated: April 21, 2017 02:53 IST