शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनदायी’त अनेक आजारांचा समावेश का नाही?

By admin | Updated: July 11, 2017 01:53 IST

राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत समावेश असलेल्या अनेक आजारांचा राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश का नाही ...

हायकोर्टाची विचारणा : राज्य शासनाला मागितले उत्तरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत समावेश असलेल्या अनेक आजारांचा राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश का नाही अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य शासनाला करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.यासंदर्भात डॉ. महात्मे रुग्णालयाचे विश्वस्त अनिल वैरागडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. एका सर्वेक्षणानुसार, देशातील ४७ टक्के नागरिक आजारांवरील उपचारासाठी मालमत्ता विकतात तर, २३ टक्के नागरिक पैसे नसल्यामुळे रुग्णालयात जात नाहीत. अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने १ एप्रिल २००८ रोजी राष्ट्रीय आरोग्य विमा योजना सादर केली. या योजनेवर केंद्र शासन ७५ टक्के, तर राज्य शासन २५ टक्के खर्च करते. सर्व प्रकारच्या लहान आजारांवर उपचाराची सुविधा असलेली ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली होती. यांतर्गत रुग्णाला ३० हजार रुपयांपर्यंत उपचार खर्च मिळत होता. दरम्यान, राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू करून राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेची अंमलबजावणी बंद केली. त्यामुळे गरजू नागरिकांवर अन्याय झाला आहे. जीवनदायी योजनेमध्ये अनेक आजारांवर उपचार उपलब्ध नाहीत. परिणामी राज्यात दोन्ही योजना सुरू ठेवाव्यात असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.