लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ९०३.०१ चौरस मीटर जागेत अनधिकृत बंगला उभारला होता. सुरुवातीला १९९९ मध्ये आंबेकर याने २१.३० चौरस मीटर बांधकामाची मंजुरी घेतली होती. परंतु प्रत्यक्षात ९०३.०१ चौरस मीटर जागेत बांधकाम केले. म्हणजेच तब्बल ८८१.७१ चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून सात वर्षापूर्वी आलिशान बंगला उभारला. असे असतानाही महापालिकेने या बंगल्यावर आजवर कारवाई केली नाही. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अतिक्रमण व अवैध बांधकामाविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने आंबेकरच्या आलिशान बंगल्यावर बुधवारी कारवाईला सुरुवात झाली.
कुख्यात आंबेकरच्या बंगल्यावर मनपाने आजवर कारवाई का केली नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 20:30 IST
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने तब्बल ८८१.७१ चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून सात वर्षापूर्वी आलिशान बंगला उभारला. असे असतानाही महापालिकेने या बंगल्यावर आजवर कारवाई केली नाही.
कुख्यात आंबेकरच्या बंगल्यावर मनपाने आजवर कारवाई का केली नाही?
ठळक मुद्देमंजुरी २१.३० ची : बांधकाम ९०३.०१ चौरस मीटर क्षेत्रात