शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

विदेशात मुख्याध्यापिका गेल्याची माहिती का दिली नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 21:19 IST

विदेश दौऱ्यावर गेलेल्या मुख्याध्यापिकेची माहिती, माहितीच्या अधिकारात न दिल्यामुळे राज्य माहिती आयोगाने १० हजार रुपये नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास द्यावी, अशी कारवाई केली आहे.

ठळक मुद्देराज्य माहिती आयोगाकडून १० हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदेश दौऱ्यावर गेलेल्या मुख्याध्यापिकेची माहिती, माहितीच्या अधिकारात न दिल्यामुळे राज्य माहिती आयोगाने १० हजार रुपये नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास द्यावी, अशी कारवाई केली आहे.हे प्रकरण कामठी गोरा बाजार येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट येथील आहे. या शाळेच्या मुख्याध्याफिका २९ सप्टेंबर ते १६ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत देशाबाहेर दौऱ्यावर गेल्या होत्या. संबंधित मुख्याध्यापिका या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका होत्या. त्यांच्या दौऱ्याच्या काळात इंग्रजी शिकविण्यासाठी ज्या नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती किंवा कार्यभार सोपविण्यात आला होता त्यांचे नाव, नियुक्ती आदेश व वैध मान्यताशिवाय शिक्षकांची डेली नोटस् साक्षांकित प्रत देण्यात यावी. तसेच दौऱ्याच्या काळात शिक्षक हजेरी रजिस्टरची साक्षांकित प्रत, दौऱ्याची संस्थेस व शिक्षण विभागाकडून घेतलेली परवानगीची प्रत आदीची मागणी तक्रारकर्ते हेमंंत गांजरे यांनी केली होती. परंतु माहितीच्या अधिकारात जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती न दिल्यामुळे, तक्रारकर्ते अपिलात गेले. अपिलातही तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला तक्रार केली. त्यामुळे आयोगाने याप्रकरणी सुनावणी करताना, प्रथम अपिलीय अधिकारी, जनमाहिती अधिकारी यांनाही दोषी ठरविले. आयोगाने आदेश देऊनही तक्रारकर्त्यास माहिती दिली नाही; शिवाय आयोगाच्या निर्देशानुसार कोणतीही कार्यवाही केलेली नाही. आयोगाने आक्षेप घेतले की प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सुनावणी घेऊन आदेश पारित केले नाही, आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही केली नाही, सुनावणीस अनुपस्थित राहिले, ही बाब माहिती कायद्याच्या उद्दिष्टास मारक ठरते, असेही ताशेरे त्यांनी ओढले. या कृतीमुळे आयोगाने माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम कलम १९ (८) अन्वये १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश पारित केले. तसेच सेंट जोसेफ कॉन्व्हेंटच्या जनमाहिती अधिकारी यांच्यावर ५००० रुपयांची शास्ती लावली. ही रक्कम शाळेच्या जनमाहिती अधिकारी यांच्या वेतनातून वसूल करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता