शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

हेरिटेज कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का होऊ दिली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:28 IST

शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्कचे अतिक्रमण व अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. असे असताना कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का झाली, या ठिकाणी अतिक्रमण कसे करण्यात आले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला फटकारले.

ठळक मुद्देहायकोर्टाने मनपाला फटकारले : २३ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्कचे अतिक्रमण व अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. असे असताना कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का झाली, या ठिकाणी अतिक्रमण कसे करण्यात आले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला फटकारले. तसेच, संबंधित निर्देशांची अवमानना व कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेवर २३ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २७ एप्रिल २०१७ रोजी उच्च न्यायालयाने कस्तुरचंद पार्कवरील व आजूबाजूचे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचा आदेश महानगरपालिकेला दिला होता. या कारवाईसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. तसेच, कस्तुरचंद पार्कवर परत अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले होते. असे असताना महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने जबाबदारीला न्याय दिला नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे कस्तुरचंद पार्कची दुरवस्था झाली. मैदान ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. मैदानावर झाडेझुडपे वाढली आहेत. मैदानावरील स्मारकामध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. काही व्यक्ती या स्मारकाचा रहिवासी उपयोग करीत आहेत. न्यायालयाने या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. न्यायालय हे कायदे व जनहिताचे संरक्षक असते. ते अशा परिस्थितीकडे मूकदर्शक होऊन बघत राहू शकत नाही. या परिस्थितीवरून स्थानिक प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशांचे गंभीरतेने पालन केले नसल्याचे स्पष्ट होते. त्यावर स्थानिक प्रशासनाने उत्तर देणे आवश्यक आहे, असे परखड निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले. तसेच, पुढील तारखेपर्यंत कस्तुरचंद पार्कवरील अतिक्रमण हटविण्याची प्रशासनाला मुभा दिली. न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे, अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी महापालिकेतर्फे तर, अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी सरकारतर्फे कामकाज पाहिले.प्रकरणावर अकस्मात सुनावणी केलीयासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. कस्तुरचंद पार्कचा अनधिकृत उपयोग होत असल्याची बाब लक्षात घेता २०१७ मध्ये न्यायालयाने स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्धारित कामकाजात या प्रकरणाचा समावेश नव्हता. वर्तमानपत्रांमध्ये कस्तुरचंद पार्कच्या सध्याच्या दुरवस्थेची बातमी वाचल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर अकस्मात सुनावणी केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क