शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

न.प.चा कौल कुणाला?

By admin | Updated: January 9, 2017 02:32 IST

जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खापा, कामठी, रामटेक आणि उमरेड नगर परिषदेच्या

नागपूर : जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खापा, कामठी, रामटेक आणि उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी रविवारी (दि. ८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान मतदान घेण्यात आले. या सर्व ठिकाणी एकूण ३३१ विविध मतदान केंद्रांवर सरासरी ७३.०३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परिणामी, नगराध्यक्षपदाच्या नऊ जागांसाठी एकूण ७० आणि नगरसेवकपदाच्या १८५ जागांसाठी एकूण ८६४ उमेदवारांचे राजकीय भाग्य मशीनबंद करण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान काटोल वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नरखेड येथे एकूण २५ मतदान केंद्रांवर १७,५११ मतदारांपैकी ७१.६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे नगराध्यक्ष पदासाठी नऊ तर नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात आहेत. काटोल येथे ७०.७४ टक्के मतदान झाले. येथे एकूण ३१,८२४ मतदार असून, ४४ मतदान केंद्रांंवर मतदान घेण्यात आले. येथे नगराध्यक्ष पदासाठी ९ आणि नगरसेवकांच्या २३ जगांसाठी ११५ उमेदवार भाग्य आजमावत आहेत. कळमेश्वर येथे २४ मतदान केंद्रांवर १६,५९० मतदारांपैकी ७५.६९ टक्के मतदारांनी मतदान केले. येथे नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६७ तर नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. मोहपा येथे एकूण ५,६६७ मतदारांपैकी ८५.९६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे नऊ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून, नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६८ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले. सावनेर येथे एकूण ३४ मतदान केंद्रांवर २४,८८६ मतदारांपैकी ७३.५२ टक्के मतदारांनी मतदान केले. येथे नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवकांच्या २० जागांसाठी एकूण ७५ उमेदवारांनी त्यांचे आव्हान कायम ठेवले होते. खापा येथे नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवकांच्या १७ जागांसाठी एकूण ६१ उमेदवार रिंगणात होते. येथे १७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून, एकूण ११,८९२ मतदारांपैकी ७४.५२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कामठी येथे एकूण १०२ मतदान केंद्रांवर ७८,९६० मतदारांपैकी ६०.१७ टक्के मतदारांनी मतदान केले. येथे नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२ आणि नगरसेवकांच्या ३२ जागांसाठी १८९ उमेदवार रिंगणात आहेत. रामटेक येथे एकूण १८,५१९ मतदारांपैकी ७०.२० टक्के मतदारांनी शहरातील २६ मतदान केंद्रांवर मतदान केले. येथे नगराध्यक्ष पदासाठी सात आणि नगरसेवकांच्या १७ जागांसाठी एकूण ८१ उमेदवार रिंगणात होते. उमरेड येथे ५० मतदान केंद्रांवर एकूण ५९,७८४ मतदारांपैकी ७४.८७ टक्के मतदारांनी मतदान केले. येथे नगराध्यक्ष पदासाठी एकूण आठ तर नगरसेवकांच्या २५ जागांसाठी १३३ उमेदवारांनी आपापले राजकीय भाग्य आजमावले. (जिल्हा प्रतिनिधी) १०.३० वाजतानंतर मिळेल पहिला कल जिल्ह्यातील नऊ ठिकाणी सोमवारी (दि. ९) सकाळी १० वाजतापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. मतमोजणी ही स्थानिक ठिकाणी केली जाईल. यासाठी संबंधित ठिकाणी आठ ते १४ टेबल्स तयार करण्यात आले असून, ही मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये केली जाईल. मतमोजणीच्या ठिकाणी अनूचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे झाले मतदान (%) नरखेड - ७१.६४ काटोल - ७०.७४ कळमेश्वर - ७५.६९ मोहपा - ८५.९६ सावनेर - ७३.५६ खापा - ७४.५२ कामठी - ६०.१७ रामटेक - ७०.२० उमरेड - ७४.८७ गोंदिया जिल्ह्यात गोंदिया न.प.साठी ६२.७२ तर तिरोड्यात ७०.१५ टक्के मतदान झाले .