शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

चुकतेय कोण ?

By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST

उपराजधानीत रस्त्यांवरील वाढत्या वर्दळीसोबतच अपघाताचे धोकेही वाढले आहेत. वाहनचालक वाहतुकीचे नियम धुडकावत वेगाने व बेशिस्तीने वाहने चालविताना नजरेस पडतात.

पोलिसांची निष्क्रियता : सिग्नल तोडले तरी थांबविले नाहीनागपूर : उपराजधानीत रस्त्यांवरील वाढत्या वर्दळीसोबतच अपघाताचे धोकेही वाढले आहेत. वाहनचालक वाहतुकीचे नियम धुडकावत वेगाने व बेशिस्तीने वाहने चालविताना नजरेस पडतात. परंतु पोलीसही तेवढ्याच बेशिस्तीने विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. लोकमतच्या चमूने मंगळवारी शहरातील अतिवर्दळ असलेल्या नऊ चौकांना भेटी दिल्या आणि एका मोटारसायकलस्वारास विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यास सांगितले आणि पोलिसांची निष्क्रियता अनुभवली. अनेक अतिवर्दळीच्या चौकात तर पोलीसच नव्हते. जिथे होते त्या चौकातील एका कोपऱ्यात सावलीच्या ठिकाणी फक्त उभे होते. मोटारसायकलस्वार सिग्नल तोडून, विरुद्ध दिशेने गेला तरी त्यांचे दुर्लक्ष होते, ज्यांचे लक्ष होते त्यांनी पाहूनही न पाहिल्यासारखे केले.लॉ कॉलेज चौक मोटारसायकल चालकाने आपला प्रवास सुरू केला तो ‘लॉ कॉलेज चौकातून’. याच चौकात सोमवारी अ‍ॅड. विजया बोडे यांना एका वाहनाने चिरडले. या चौकात आज एक नव्हे तर दोन वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. परंतु हे दोन्ही पोलीस चौकाच्या एका कोपऱ्यात, इमारतीच्या सावलीत उभे होते. वाहनचालकाने अगदी वाहतूक पोलीस शिपायाच्या समोरून विरुद्ध दिशेने वाहन चालवीत नेले. याशिवाय लाल दिव्यातही सिग्नल तोडले. सिग्नलवर नियुक्त पोलीस आपल्याच तंद्रीत होता. त्याचे याकडे लक्ष असूनही न पाहिल्यासारखे केले. साधी शिटीही वाजविली नाही.कॉटन मार्केट चौककॉटन मार्केट चौकाच्या एका कोपऱ्यात तीन पोलीस गप्पा गोष्टीत रंगले होते. चार-पाच मिनिटानंतर एक पोलीस व्हॅन आली. त्यातील चालक आणि एक वाहतूक पोलीस असे सर्व मिळून श्री गणेश भोजनालयात जेवण्यासाठी गेले. चौकात पोलीस नसल्याचे पाहत अनेकांनी सिग्नल तोडण्याची स्पर्धाच लावली. आमच्या मोटारसायकलनेही या स्पर्धेत भाग घेतला. एक-दोन नव्हे तर चार-पाच वेळा सिग्नल तोडला. व्हेरायटी चौकव्हेरायटी चौकात बुथच्या बाहेर एक पोलीस शिपाई उभा होता, तर ‘अ‍ॅडिशनल स्पेशल ट्राफिक आॅफिसर’ अर्थात सामाजिक कार्यकर्ता हा ‘वन वे’कडून येणाऱ्यांना पकडण्यासाठी तैनात होता. आमचा मोटारसायकल स्वार रिजंट टॉकीजकडून विरुद्ध दिशेने व्हेरायटी चौकात आला. चौकाच्या मधोमध मार्गाच्या विरुद्ध दिशेने झेब्रा क्रॉसिंगवर बराच वेळ उभा होता. परंतु त्या पोलिसाचे लक्षच गेले नाही. त्याचे पूर्ण लक्ष कोणी दुचाकीस्वार विद्यार्थी मिळतो का, याकडेच होते. पोलिसाकडे पाहत मोटारसायकलस्वाराने लाल दिव्यात वाहन टाकले, मात्र साधी शिटीही त्या शिपायाने मारली नाही. विशेष म्हणजे, सीताबर्डी पोलीस ठाण्याच्यासमोर दोन वाहतूक पोलीस गप्पा मारीत होते, त्यांचेही याकडे लक्ष नव्हते. झाशी राणी चौकशहराचे हृदय असलेल्या झांशी राणी चौकात दुपारचे २ वाजले असताना एकही पोलीस दिसून आला नाही. पोलीस बुथजवळच सहा सिटर आॅटोरिक्षा उभी करून एक चालक प्रवाशांना ओरडून-ओरडून बोलवित होता. तिथे इतरही आॅटोचालकांनी गर्दी केली होती. आमच्या मोटारसायकलस्वाराने सिग्नल तोडत रस्त्याच्या मधोमध वाहन उभे केले. साधारण तीन-चार मिनिटापर्यंत वाहन उभे होते. परंतु कोणीच हटकले नाही. मात्र, एका वृद्ध वाहनचालकाने ‘मरना है का’ असे म्हणत तेथून जाण्यास सांगितले. विशेष म्हणजे नेहमीच या चौकात विरुद्ध दिशेने आॅटोचालक रहदारी करीत असतात, मात्र आतापर्यंत एकाही चालकावर कारवाई झालेली नसल्याची माहिती आहे.हे आहेत नियम आणि कायदेविरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यास मोटार वाहन कायद्याचे कलम ११९/१७७ अन्वये दोषी ठरवून त्याच्याकडून १०० रुपये दंड आकारल्या जाऊ शकतो. वाहनचालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसेल तर त्याला पुन्हा ६०० रुपये, इन्श्युरन्स नसेल तर ६०० रुपये, सिग्नल तोडल्यास १०० रुपये, नो पार्किंगमध्ये वाहन ठेवल्यास १०० रुपये व वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास ६०० रुपये असा दंड वसूल केला जाऊ शकतो. वाहतूक पोलिसांना दररोज दहा कारवाया करण्याची सक्ती आहे. परंतु अनेक कर्मचारी याच्या आड लाच घेत असल्याचे चित्र आहे.सिग्नल तोडण्यात तरुणीही आघाडीवरचौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. ज्या चौकाच्या एका कोपऱ्यात सावलीत पोलीस उभे असतात तो मार्ग सोडल्यास इतर मार्गावरील लाल दिव्यात वाहन दामटतात. वाहतूक पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे सामूहिकपणे सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात बहुसंख्य तरुणांसोबतच तरुणीही आघाडीवर असल्याचे आजच्या ‘लोकमत इन्व्हेस्टिगेशन’मध्ये दिसून आले.