शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

२५० टन कचरा कोण उचलणार

By admin | Updated: September 10, 2015 03:23 IST

स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या नागपूर शहरातील लोकांना महापालिकेकडून चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

महापालिका : शहरातील १२०० पैकी ९५० टन कचऱ्याची उचललोकमत विशेषगणेश हुड  नागपूरस्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या नागपूर शहरातील लोकांना महापालिकेकडून चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. परंतु दररोज शहरातील २५० टन कचरा उचललाच जात नाही. या पासून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने हा कचरा उचलणार कोण, असा गंभीर प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पथदिवे व स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु शहरात दररोज १२०० टन कचऱ्याची निर्मिती होते. यातील ९५० टन कचऱ्याची २५० वाहनाव्दारे उचल केली जाते. शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी मनपा तिजोरीतून वर्षाला २८ ते ३० कोटीचा निधी खर्च केला जातो. परंतु शहरातील पूर्ण कचरा उचलला जात नसल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील रस्त्यांची स्वच्छता व कचरा उलण्यासाठी मनपाचे ७ हजार व कनक कंपनीचे १ हजार सफाई कर्मचारी आहेत. परंतु शहरातील २४ लाख लोकसंख्येचा विचार करता सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. एक कर्मचारी ९०० मीटर रस्ता स्वच्छ करतो. मोठा रस्ता असल्यास ५०० मीटर रस्ता स्वच्छ करतो. शहरातील रस्त्यांचे जाळे विचारात घेता सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. भांडेवाडी येथे कचऱ्यापासून गांढूळ खत निर्माण करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु मागील काही वर्षापासून हा प्रकल्प बंद आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. शहरातून दररोज उचलण्यात आलेला ९५० टन कचरा भांडेवाडी येथील कचरा डेपोत आणला जातो. त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. परंतु यातील १५० ते २०० टन कचऱ्यावर प्रक्रि या केली जाते. उर्वरित कचरा कचरा डेपोत साठवला जातो. प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून वीटा तयार केल्या जातात. परंतु गोळा केलेल्या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही.भांडेवाडी प्रकल्पाची क्षमता संपलीभांडेवाडी प्रकल्पाची कचरा साठवण्याची क्षमता संपत आली आहे. पर्यायी जागा उपलब्ध न केल्यास पुढील काही वर्षात शहरातून उचल करण्यात आलेल्या कचऱ्याची साठवणूक करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)