शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

गुन्हेगारांच्या मुसक्या बांधणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

उमरेड : ‘माझे उमरेड मला परत द्या’ अशी आर्त हाक उमरेडच्या राजकीय आखाड्यात दोन वर्षांपूर्वी देण्यात आली होती. शांत-संयमी ...

उमरेड : ‘माझे उमरेड मला परत द्या’ अशी आर्त हाक उमरेडच्या राजकीय आखाड्यात दोन वर्षांपूर्वी देण्यात आली होती. शांत-संयमी आणि विविध संस्कृतीने नटलेल्या उमरेड मतदारसंघात खून, गांजा, चोरी-चकाटी, सोशल मीडियावर अश्लीलता, जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला रोखणार कोण, असा सवाल केला जात आहे.

रेतीच्या अवैध वाहतुकीच्या गोरखधंद्याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. दररोज पहाटेपासून ते रात्रभर गोसेच्या पात्रातील आणि अवतीभवती असलेली रेती ओरबडून काढली जात आहे. एकापाठोपाठ एक सुसाट वेगाने पवनी, भिवापूर, उमरेड शहर पार करीत ट्रक, टिप्परच्या माध्यमातून राज्याच्या उपराजधानीत हा बेहिशेबी ‘माल’ रवाना होत आहे. मात्र, यावर अधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी सारेच मूग गिळून गप्प का, असा सवाल केला जात आहे. या गोरखधंद्यावर कुणाचाही अंकुश नसल्याचा आरोप आता खुलेआम होत आहे.

अनेक ठिकाणांहून विनापरवानगीने मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याच्याही तक्रारी कमी नाहीत. याकडेसुद्धा मुद्दाम डोळेझाक करीत प्रकरणावर पांघरूण टाकण्याचेच काम होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

कुही येथील मौजा मांगली येथे एका शेतमजुराचा खून करण्यात आला. नरेश दशरथ कुरूटकर (३७) या शेतमजुराचा कोणताही गुन्हा नसताना केवळ पैशांच्या मोहापायी त्याचा झोपेतच दोन नराधमांनी खात्मा केला. त्याच दिवशीची दुसरी घटना उमरेडच्या गांगापूर चौकात घडली. अगदी क्षुल्लक कारणावरून शुभम मोतीराम ठवकर या तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार करीत त्याला संपविले गेले. एकीकडे हा तरुण रक्तबंबाळ होत असताना दुसरीकडे अनेकजण केवळ बघ्याची भूमिका घेत होते. उमरेड परिसरात मागील काही वर्षांपासून असामाजिक तत्त्वांचा बोलबाला दिसून येतो. एकमेकांविरुद्ध कट-कारस्थान, डावपेच रचण्याच्या असंख्य घटना घडत आहेत. पोलीस-प्रशासनाचा धाक संपला की काय, अशी परिस्थिती तरी सध्या उमरेड नगरीत दिसून येते.

सोशल मीडियावर अभद्र भाषा

उमरेड परिसरातील काही सोशल मीडिया ग्रुपवर अभद्र, अश्लील भाषेचा प्रयोग करणारे असंख्य मेसेज तथा व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहेत. दिवसभर चॅटिंगमध्ये गुंतलेले ‘भामटे’ अभद्र भाषेत शेरे मारतात. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वातावरण खराब करण्याचे काम करतात. यातूनच विविध भांडणे, हाणामारीचे प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. यावरही अंकुश असावा आणि कारवाई व्हावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

गांजा तस्करीत महिला

उमरेड पोलिसांनी गांजा तस्करीत कुही परिसरातील दोघांना अटक केली. यात शिवराम खडसे, रा. मुसळगाव याच्यासह एका महिला आरोपीचा समावेश आहे. काही वर्षांपासून परिसरात हा धंदासुद्धा मोठ्या प्रमाणावर आपली पाळेमुळे घट्ट करीत होता. गांजा तस्करीत महिलेचा समावेश आढळून आल्याने अनेकांचे डोळे वटारले आहेत. गांजा तस्करीचा प्रत्येक कोपरा पोलिसांनी तपासावा, अशी मागणी जोर धरत आहे.