शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खोदलेले रस्ते बुजविणार कोण?

By admin | Updated: June 15, 2017 02:00 IST

नागपूर शहरातील रस्त्यांची देखभाल करण्यासाठी सर्व विभागांची समन्वय समिती गठित करण्यात आलेली आहे.

राजीव सिंग । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील रस्त्यांची देखभाल करण्यासाठी सर्व विभागांची समन्वय समिती गठित करण्यात आलेली आहे. परंतु या समितीच्या समावेश असलेल्या विभागातच समन्वयाचा अभाव आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आल्याचे चित्र आहे. रस्त्यांचे खोदकाम करण्यासाठी महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाकडून अनुमती दिली जाते. परंतु यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या विभागाकडे केवळ तीन अधिकारी आहेत. गेल्या दोन वर्षांत शहरात जवळपास ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे खोदकाम करण्यासाठी अनुमती देण्यात आली. यात स्मार्ट सिटी प्रकल्पातील एलअ‍ॅन्डटीच्या ८२४.०५७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा समावेश नाही. राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यापूर्वी या कंपनीला नागपूर शहरात काम करण्याला अनुमती दिली आहे. गेल्या दोन वर्षांत रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन, एमएसईडीसीएल, इंडस टॉवर, टाटा कम्युनिकेशन, बीएसएनएल यासह व्यक्तिगत स्तरावर अनेकांना खोदकामाची अनुमती देण्यात आली आहे. यातून महापालिकेला २५ कोटींचे उत्पन्न मिळाले. परंतु खोदकामामुळे याहून अधिक नुकसान झाले आहे. खोदकाम करण्यात आलेल्या किती रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली, याबाबतचा डाटा हॉटमिक्स विभागाकडे उपलब्ध नाही. यामुळे खोदकामाची अनुमती तर दिली, परंतु यावर देखरेख व दुरुस्तीबाबत तत्परता नसल्याचे चित्र आहे. वास्तविक कोणत्याही भागात नवीन केबल टाकण्यापूर्वी समन्वय समितीत चर्चा होते. खोदकामासाठी हॉटमिक्सची अनुमती एक खिडकी योजनेंतर्गत खोदकामासाठी अनुमती देण्याचे अधिकार हॉटमिक्स विभागाला देण्यात आले आहे. मुख्य अभियंता यांच्या निर्णयानंतर अनुमती दिले जाते. यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या विभागाची आहे. जलप्रदायकडे पाण्याच्या लाईनची जबाबदारी शहरात गेल्या पाच वर्षांपासून पाण्याची लाईन टाकण्याचे काम पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या कंपनीकडून केले जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाची आहे. हे अधिकार हॉटमिक्स विभागाला नुकतेच देण्यात आले आहे. भूमिगत वीजवाहिन्या टाकणार शहरातील सर्व भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहे. याबाबत महापालिका व एमएसईडीसीएल यांच्यात नुकताच करार करण्यात आला आहे. यासाठी महापालिका प्रति मीटरला १०० रुपये शुल्क आकारणार आहे. काही ठिकाणी या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.