शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपराजधानीत काँग्रेसकडून कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 06:00 IST

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपराजधानीत लढणार तरी कोण, असा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देबाहेरचा उमेदवार ‘लॅण्ड’ करण्यास विरोधमतदारसंघातच घेरण्यात अपयश

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते आपल्या गळाला लावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात घेरण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीकडून काहीच हालचाली होताना दिसत नाही. गेल्यावेळी लढलेले उमेदवार यावेळी लढायला इच्छुक नाही. बाहेरचा उमेदवार लादला जाऊ नये, अशी भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अशात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपराजधानीत लढणार तरी कोण, असा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.२०१४ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी १,१३,९१८ मते घेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचा ५८,९४२ मतांनी पराभव केला होता. गुडधे यावेळी येथून लढण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी पश्चिम नागपूरसाठी अर्ज केला आहे. बहुजन विचार मंचचे संयोजक नरेंद्र जिचकार, जय जवान जय किसान संघटनेने संयोजक प्रशांत पवार यांच्याही नावाची प्रदेश काँग्रेसकडे चर्चा आहे. पण जिचकार यांनीही पश्चिम नागपूरसाठी दावा केला आहे.नागपूर लोकसभा लढलेले माजी खासदार व काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले व भाजप सोडून काँग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, हे दोन्ही नेते दुसऱ्याच मतदारसंघांसाठी इच्छुक आहेत.शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे समर्थक असलेल्या माजी नगरसेविका रेखा बाराहाते, शहर काँग्रेसचे सचिव किशोर उमाठे यांनी अर्ज केले आहेत. या दोन्ही इच्छुकांनी स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. पक्षाने बाहेरचा उमेदवार येथे ‘लॅण्ड’ करू नये, तसे झाले तर स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऐनवेळी श्रेष्ठींनी वरून उमेदवार दिला तर त्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याचा धोका आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे पश्चिम नागपूरच्या तयारीत व्यस्त आहेत.पक्षाने दोन वर्षांपूर्वी सांगितले असते तर विचार केला असता, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी जोरात आहे. दक्षिण-पश्चिममध्येही ती लपून राहिलेली नाही. त्यामुळे सर्व गटांना चालेल अशा नावाच्या शोधात काँग्रेस आहे.मुख्यमंत्री राज्यभरातील कामात व्यस्त असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ५५,११६ मतांची आघाडी मिळाली. मुख्यमंत्र्यांचे पाच वर्षे मतदारसंघाच्या विकासाकडे बारकाईने लक्ष होते. ते न चुकता मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेत होते.

टॅग्स :Electionनिवडणूक