शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

हायस्पीडला ब्रेक कोण लावणार ?

By admin | Updated: May 12, 2015 02:25 IST

मध्यरात्री मद्याच्या नशेत स्वत:च्या मस्तीत मश्गुल होऊन इतरांच्या जीवाला मातीमोल समजणारे शेकडो सल्लू लोकमत

सलमानच्या हिट अ‍ॅण्ड रन नंतर बोध घेण्याची गरज नागपूर : मध्यरात्री मद्याच्या नशेत स्वत:च्या मस्तीत मश्गुल होऊन इतरांच्या जीवाला मातीमोल समजणारे शेकडो सल्लू लोकमत चमूला शहराचा फेरफटका मारला असता आढळून आले.पोलीस केवळ थर्टीफर्स्ट आणि शिमग्यात जागोजागी लोखंडी कठडे उभारून मद्यधुंद वाहनचालकांना अटकाव करतात. रोजच्या मध्यरात्री पोलीस कोठेही नजरेस पडत नाही. उपराजधानीत बेवारस आयुष्य जगणारे शेकडो आहेत. ते रस्त्याच्या कडेला फुटपाथ, रस्ता दुभाजक, बसथांब्यांचे शेड आणि चौकातील वाहतूक पोलीस बुथचा आश्रय घेऊन रात्रीचा विसावा घेतात. रात्रपाळी आटोपून फॅक्टरी आणि कार्यालयातून बाहेर पडून घराच्या वाटेवरही शेकडो कर्मचारी असतात. मध्यरात्रीपर्यंत बार आणि हॉटेलमध्ये बसून मद्याचे पेग गळ्यात उतरवणारे मद्यपी परतीच्या वेळी मात्र मोटरसायकली आणि मोटारगाड्या बेदरकारपणे आणि हेलकावे खात चालवतात. दिवसाही हे वास्तव कायमच असते. ते या सामान्य माणसांच्या जीवाची कोणतीही परवाच करीत नाहीत. मुंबईत १३ वर्षांपूर्वी सुपरस्टार सलमान खानने मद्याच्या नशेत बेदरकारपणे कार चालवून फुटपाथवर झोपलेल्या जीवांना चिरडले आणि निर्लज्जपणे तो पळूनही गेला. नागपुरातही अशा घटना घडल्या आणि घडत आहेत. एक-दोन दिवसच या घटनांची चर्चा होते. त्यानंतर त्या फाईलबंद होतात. सामान्यांचा हकनाक बळी जातो. आक्रोश आणि हुंदकेच तेवढे राहतात. कुटुंबाचा आधार गेल्याने सारेच निराश्रित होऊन रस्त्यावर येतात. अशा या सल्लूंना कायमचे वेसण घालणारी आणि त्यांच्या मस्तवाल कृत्याने आधारहीन झालेल्या कुटुंबांना सावणारी स्वतंत्र यंत्रणा का निर्माण केली जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (लोकमत चमू)