शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  मोकाट जनावरांना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:23 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असतानाच शहरातील नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरात तब्बल ५६९ जनावरांचे अवैध गोठे आहेत. अशा गोठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे.

ठळक मुद्देशहरात ५६९ अवैध गोठे : अपघाताचा धोका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असतानाच शहरातील नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरात तब्बल ५६९ जनावरांचे अवैध गोठे आहेत. अशा गोठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे.गाई व म्हशींचे गोठे उभारण्यासाठी दुग्धविकास विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु शहरात परवानगी न घेताच गोठे उभारले जातात. औपचारिकता म्हणून संबंधित गोपालकावर कारवाई केली जाते. कठोर कारवाई होत नसल्याने शहरातील मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी कोंडवाडा शुल्कात दुपटीने वाढ करण्यात आली. परंतु मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने याला आळा बसलेला नाही.अपघाताचा धोकापावसाळ्यात शहराच्या सर्वच भागातील पशुपालक जनावरे मोकळी सोडतात. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. रात्रीच्यावेळी वर्दळीच्या रस्त्यावर कोरड्या जागेत जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे अपघात होतात. अनेकदा दुचाकी वाहनचालकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. तसेच जनावरे रस्त्यावरील हिरवळ नष्ट करतात. लावण्यात आलेल्या झाडांनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मनुष्यबळाचा अभावकोंडवाडा विभागातर्फे मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली जातात. जनावरे सोडण्याठी पशुपालकांना दंड आकारला जातो. परंतु जनावरे पकडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहने नसल्याने या कारवाईला मर्यादा आहेत. त्यामुळे जनावरे मोकाट सोडण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.पोलीस कारवाई करीत नाहीजनावरे मोकाट सोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोंडवाडा विभागाने पोलीस विभागाकडे शहरातील शंभराहून अधिक पशुपालकांची यादी पाठविली आहे. परंतु पोलीस विभागाकडून कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पशुपालकांना कायद्याचाही धाक राहिलेला नाही.कशी होणार स्मार्ट सिटीशहरातील रस्ते सिमेंट क्राँक्रिटचे होत आहेत. शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून रस्त्यांच्या दुभाजकावर व चौकाचौकात झाडे लावून हिरवळ निर्माण केली जात आहे. परंतु वर्दळीचे रस्ते व चौकाचौकात मोकाट जनावरे दिवसभर ठिय्या मांडतात. हिरवळ नष्ट करतात, अशा परिस्थितीत स्मार्ट सिटी कशी होणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या