शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोण खरे, तावडे की विद्यापीठ प्रशासन ?

By admin | Updated: April 23, 2017 02:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

पदभरतीसंदर्भात संभ्रम : तीन महिन्यांत कशी होणार १०० टक्के पदांची भरती? नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वादात सापडण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाच्या निर्देशांचा हवाला देत प्रशासनाने २३ जागांसाठी जाहिरात काढली. मात्र एकूण पदांच्या ५० टक्के भरतीचा नियम शिक्षण क्षेत्रासाठी लागू नाही, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. अशास्थितीत आता नेमके कोण खरे, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उत्पन्न होत आहे. विद्यापीठांत सत्रप्रणाली लागू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे; शिवाय येत्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कमीतकमी ५० टक्के रिक्त पदांवर भरती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या निर्देशांवर बोट ठेवत केवळ २३ शिक्षकेतर पदांची भरती करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. राज्य शासनाने पदभरतीसंदर्भात ५० टक्के रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात जारी केलेल्या दिशानिर्देशांचा हवाला यात अधिकाऱ्यांनी दिला. मात्र वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेले पदभरतीचे निर्देश हे शिक्षण व पोलीस विभागाला लागू नव्हतेच, असे विनोद तावडे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. वित्त विभागाने काही विभागांना अगोदर ७५ टक्के पदभरतीची सूट दिली होती; मात्र नंतर सुधारणा करून ही मर्यादा ५० टक्क्यांवर आणली होती. शिक्षकेतर प्रवर्गात सरळसेवेतील रिक्त पदांच्या ५० टक्के किंवा एकूण मंजूर पदांच्या ४ टक्के यापैकी जे कमी असतील ते भरा, असे शासननिर्देशात नमूद होते. त्यानुसारच प्रक्रिया राबवत असल्याचा दावा विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला आहे. तावडे यांनी नागपुरात पदभरतीची मर्यादा कोण खरे, तावडे की विद्यापीठ प्रशासन ? शिक्षण विभागासाठी नाही, असे सांगितले. मंत्र्यांनीच स्पष्टोक्ती केल्यामुळे नागपूर विद्यापीठातील भरतीबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, याबाबत लेखी निर्देश नेमके कधी देण्यात आले होते, याबाबत तावडे यांनी कुठलीही स्पष्टोक्ती केली नाही. पूर्ण पदभरतीबाबत निर्देश केव्हा? विद्यापीठांची गरज व मागणी लक्षात घेता पुढील तीन महिन्यांत सर्व विद्यापीठांतील रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा तावडे यांनी नागपुरात केली. मात्र पदभरतीची प्रक्रिया लक्षात घेता खरोखरच तीन महिन्यांत पदांची भरती शक्य नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भात शासकीय निर्देश जारी करणे आवश्यक आहे. विद्यापीठांना पुढील चार महिन्यांत प्राधिकरणांच्या निवडणुकादेखील घ्यायच्या आहेत. या पार्श्वभूमीवर तावडे यांची घोषणा किती प्रत्यक्षात उतरेल, हा देखील एक मोठा प्रश्न असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.