शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी पळाल्याचे सांगितले कुणी?

By admin | Updated: July 27, 2016 02:43 IST

पोलीस ठाण्यातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच हादरलेल्या जरीपटका पोलिसांनी आरोपीला सोडून हे वृत्त बाहेर गेलेच कसे

जरीपटका ठाण्यातून आरोपी पळाला : पोलीस कर्मचाऱ्यांची खरडपट्टी नागपूर : पोलीस ठाण्यातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच हादरलेल्या जरीपटका पोलिसांनी आरोपीला सोडून हे वृत्त बाहेर गेलेच कसे, त्याचा सकाळपासून शोध घेणे सुरू केले. दुपारनंतर आरोपी विक्की बागडेची पोलिसांनी शोधाशोध केली. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास आरोपी विक्कीला पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पकडून ठाण्यात आणले. त्याला अटकपूर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ठाण्यात बसविले. मध्यरात्री पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहत विक्कीने ठाण्यातून पळ काढला. ही घटना लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली. पळालेल्या आरोपीला शोधण्यासाठी जरीपटका पोलिसांची विविध पथके परिसरात शोध घेऊ लागली. विशेष म्हणजे, अख्खे पोलीस ठाणे आरोपीला शोधण्यासाठी फिरत होते. मात्र, खरडपट्टी निघू शकते, या भीतीमुळे या आरोपी पलायनाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे अन्य वरिष्ठ अधिकारीच काय, नाईट राऊंडवर असलेले विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांनासुद्धा या घटनेची रात्री १ वाजेपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती. माहिती कक्ष आणि नियंत्रण कक्षाकडेही याबाबत कसलीच माहिती नव्हती. जरीपटका ठाण्यातील फोन उचलून बोलायला कुणी तयार नव्हते. प्रस्तुत प्रतिनिधीने जरीपटका ठाण्यातून पहाटे २ च्या सुमारास या घटनेची माहिती घेतल्यानंतर ती बातमी लोकमतने ठळकपणे प्रकाशित केली. त्यामुळे हादरलेल्या जरीपटका पोलिसांनी ही बातमी बाहेर गेलीच कशी, त्याचीच सकाळपासून चौकशी केली. काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यावर त्यासाठी तोंडसुखही घेतले. (प्रतिनिधी)