शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सचिवालय परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त कुणाकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:24 IST

पावसाळी अधिवेशनाला आता केवळ काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पावसापासून बचावासाठी प्रशासनातर्फे ‘रेनप्रूफ’ व्यवस्था केली जात आहे. पावसात साप निघण्याची शक्यता लक्षात घेता सर्पमित्रांचीही मदत घेतली जात आहे, असे असले तरी शहरातील बेवारस कुत्र्यांचाही बंदोबस्त प्रशासनाला करावा लागणार आहे. कारण सिव्हील लाईन्स परिसरातील नवीन सचिवालय परिसरात बेवारस कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातलेला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला इथेही घ्यावी लागणार मदत : उपराजधानीत सगळीकडेच हैदोस

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पावसाळी अधिवेशनाला आता केवळ काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पावसापासून बचावासाठी प्रशासनातर्फे ‘रेनप्रूफ’ व्यवस्था केली जात आहे. पावसात साप निघण्याची शक्यता लक्षात घेता सर्पमित्रांचीही मदत घेतली जात आहे, असे असले तरी शहरातील बेवारस कुत्र्यांचाही बंदोबस्त प्रशासनाला करावा लागणार आहे. कारण सिव्हील लाईन्स परिसरातील नवीन सचिवालय परिसरात बेवारस कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घातलेला आहे.शहरात सर्वत्रच कुठल्याही चौकात, रस्त्यावर बेवारस कुत्र्यांचे घोळके टपून असतात. रस्त्यावरून वाहन येताच त्यांच्यावर धावून पडतात. दुचाकी वाहन चालकांना तर आपला जीव मुठीत घेऊनच रस्त्याने चालावे लागते. दुचाकीस्वारांवर कुत्रे धावून पडले की, त्याचा अपघात ठरलेलाच, अशी परिस्थिती आहे. यातच आता सिव्हील लाईन्स परिसरातील व्हीसीए स्टेडियम चौकात असलेल्या नवीन सचिवालय परिसरात बेवारस कुत्र्यांनी हैदोस घातल्याची बाब समोर आली आहे. इमारतीत अनेक शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयात बेवारस कुत्रे ठाण मांडून असतात. तीन माळ्याच्या या इमारतीत तब्बल २० बेवारस कुत्रे आहेत. ते पायऱ्यांवर, कार्यालयात, ठिकठिकाणी ठाण मांडून असतात. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनाही मोठा त्रास होतो. ही कुत्रे कार्यालय परिसरातच घाण करीत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. इतकेच नव्हे तर रात्री रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवरही हे कुत्रे धावून जातात. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली, परंतु दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रकार केवळ या इमारतीपुरताच मर्यादित आहे, असा नाही. रविभवन, नागभवन, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे आदी भागातही बेवारस कुत्र्यांचा वावर आहे. तेव्हा प्रशासनाला यांचाही बंदोबस्त करावा लागेल, अन्यथा अधिवेशनादरम्यान ही बेवारस कुत्रे त्रासदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :dogकुत्राNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८