शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हा कचरा कुणी साफ करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:22 IST

जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे ना? मग तो कचरा साफ करताना आपण कुणाची वाट बघतो.

ठळक मुद्देजनजागृतीनंतरही आम्ही उदासीन : जबाबदारी मनपाचीच का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे ना? मग तो कचरा साफ करताना आपण कुणाची वाट बघतो. शुक्रवारी नागपुरातील अनेक रस्त्यांवर फुटलेल्या फटाक्यांचा कचरा पडून दिसला. लोकांनी आपल्या घरातील परिसर साफ केला. मात्र फोडलेल्या फटाक्यांमुळे झालेला कचरा लोकांनी तसाच सोडून दिला.हे दृश्य शहरातील स्लम, सर्वसामान्य वस्त्यांच्या तुलनेत प्रतिष्ठितांच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आले. रामदासपेठ, बजाजनगर, वर्धमाननगर, धरमपेठ या भागांमध्ये लोकांनी रात्री फोडलेल्या फटाक्यांचा कचरा रस्त्यावर पडलेला आढळला. काही इमारतींमध्ये परिसर स्वच्छ केलेला आढळला परंतु फटाक्यांचा कचरा रस्त्याच्या कडेला लोटून ठेवला होता. तुलनेत झोपडपट्ट्या व सर्वसामान्य वस्त्यांमध्ये हे दृश्य फारच क्वचित होते. कारण उच्चभ्रू लोकांना फक्त स्वच्छता अभियानातच रस्ते झाडण्याची सवय आहे. मात्र आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर आपणच केलेला कचरा, साफ करण्याची जबाबदारी मनपाची समजून दुर्लक्ष केल्याचे दिसते. गुरुवारी लक्ष्मीपूजनाला घरोघरी वस्त्यावस्त्यांमध्ये फटाके फुटले. फ्लॅटस्किममध्ये फटाके फोडण्यास जागा नसल्याने, लोकांनी रस्त्यावर येऊन फटाके फोडले. त्यामुळे रस्त्यावर फटाक्यांचा कचरा झाला. शुक्रवारी सकाळपासून मनपाचे सफाई कर्मचारी गल्लोगल्लीत झालेला कचरा साफ करण्यासाठी सकाळपासून लागले. मुख्य रस्त्यांवरील कचरा त्यांनी साफ केला. परंतु कचरा जास्त असल्याने, गल्ल्यांमध्ये ते पोहचू शकले नाही. त्यामुळे कचरा दिवसभर तसाच पडून होता.विशेष म्हणजे फटाक्यांचा झालेला कचरा हासुद्धा घातकच असतो. यात फुटलेल्या फटाक्यांचे कागद, फटाक्यांचे रसायनमिश्रित वेस्टन हेसुद्धा घातकच असतात. याला बारुद लागलेली असते. जनावरे ती खातात. विशेषत: गार्इंनी तो खाल्यास, त्याचा परिणाम दुधावर होतो. दिवाळीच्या निमित्ताने शहरात लाखो टन फटाक्यांचा कचरा होतो. हा कचरा डम्पिंग यार्डमध्ये साठविला जातो. यात न फुटलेले फटाकेही असतात, बारुद असते. त्यामुळे डम्पिंग यार्डमध्ये आग लागण्याची शक्यता असते.