शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांवर कुणी केली नसबंदी ?

By admin | Updated: September 13, 2016 02:49 IST

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या दाव्यानुसार २००६ ते २०१४ या कालावधीत शहरातील ६९,०६०

मनपाकडे रेकॉडर्च नाही : आरोग्य विभागातील अधिकारी निरुत्तर नागपूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या दाव्यानुसार २००६ ते २०१४ या कालावधीत शहरातील ६९,०६० मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात आलेली आहे. या मोबदल्यात संबंधित संस्थांना कोट्यवधी रुपये देण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्षात मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली की नाही, यासंदर्भात आरोग्य विभागाकडे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता यावर ते निरुत्तर झाले. मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे २००६ ते २०१४ या कालावधीत नसबंदी मोहीम राबविण्यात आली. पाच सेवाभावी संस्था व पशुवैद्यकीय महाविद्यालयावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु या संस्थांना नसबंदी करण्याचा अनुभव होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संस्थांकडे प्रशिक्षित व नोंदणी असलेले डॉक्टर होते का. ज्या संस्थांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती, त्यांनी यापूर्वी अशी मोहीम राबविली होती का. ती कोठे आणि कशा प्रकारे राबविली यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे माहिती उपलब्ध नाही. नसबंदी करण्यासाठी सेवाभावी संस्थांना प्रत्येक कुत्र्यामागे ४४५ रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या संस्थांनी २००८ ते २०१० या दोन वर्षांच्या कालावधीत नसबंदी मोहीम राबविली. २०१४ -१५ या वर्षात कोल्हापूरच्या एका संस्थेने १०२६० कुत्र्यांवर नसबंदी केली होती. या संस्थेला प्रत्येक नसबंदीसाठी ५२९ रुपये देण्यात आले होते. आरोग्य विभागाने मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्याची जबाबदारी सेवाभावी संस्थांसोबतच हैदराबाद येथील एका संस्थेवर सोपविली होती. नागपूर शहरातील काही संस्थांनी नसबंदीचे काम केले नाही. काही संस्थांनी २०१० पर्यंत नसबंदीची मोहीम राबविली. हैदराबादच्या संस्थेने एकाही मोकाट कुत्र्यांवर नसबंदी केलेली नव्हती, अशी माहिती आहे. (प्रतिनिधी) पडताळणी करावी लागेल नसबंदी संदर्भात महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही मोहीम राबविण्याला अनेक वर्ष झालेली आहेत. त्यामुळे याची पडताळणी करावी लागेल, असे सांगून माहिती देण्यास नकार दिला.