शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या अपयशाचे शिल्पकार कोण ?

By admin | Updated: February 1, 2016 02:57 IST

नागपूरचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला असता तर नागपुरातील भाजप नेते फेटे बांधून मिरवले असते.

विकास ठाकरे यांचा सवाल : भाजपच्या अकार्यक्षमतेचे सर्टिफिकेट मिळालेनागपूर : नागपूरचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला असता तर नागपुरातील भाजप नेते फेटे बांधून मिरवले असते. नागपुरात हेवीवेट नेते आणि कर्तबगार अधिकारी असतानाही नंबर हुकला. एकेकाळी टॉप १० मध्ये असलेले नागपूर आता पहिल्या २० मध्येही येऊ शकले नाही. आता या अपयशाचे शिल्पकार कोण, हे महापौरांनी जाहीर करावे, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला. सोबतच स्मार्ट सिटी करताना जनतेवर किती कर लादल्या जाणार आहे हे आधी जाहीर करावे व त्यानंतर जनमत घेऊनच सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. स्मार्ट सिटीत नागपूरचा नंबर हुकल्यावरून ठाकरे यांनी पत्रकार परिषद धेत सत्ताधाऱ्यांवर नेम साधला. ठाकरे म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दोन हेवीवेट नेते नागपुरातील आहेत. त्यामुळे नागपूरचा नंबर लागेल अशी अपेक्षा होती. नागपूरचा नंबर लागला असता तर महापौर प्रवीण दटके यांनी क्रेडिट घेतले असते. भाजप नेत्यांचे फेटे घातलेले होर्डिंग लागून सत्कार सोहळे झाले असते. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्वीच विरोध केला असता तर या अपयशाचे खापर आमच्यावर फोडण्यात आले असते. आता या अपयशासाठी जबाबदार कोण, केंद्र सरकारमध्ये आपसातील लढाईमुळे नागपूर कटले का, महापालिकेचा प्रस्तावच दुबळा होता का याची कारणे महापौरांनी जनतेला द्यावी. महापालिकेची विशेष सभा घेऊन तीत या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली. ठाकरे म्हणाले, गेली नऊ वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या नऊ वर्षात स्टारबस घोटाळा, पाणीपुरवठ्यात घोटाळा, कचरा घोटाळा, दहन घाट लाकूड घोटाळा, असे अनेक घोटाळे झाले. जेएनएनयुएमआर अंतर्गत महापालिकेला १९ प्रकल्प मिळाले. पण महापालिकेने एकही काम बरोबर केले नाही. केंद्राच्या पैशाचा अपव्यय करण्यात आला. अंकेक्षण अहवालात यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. कदाचित या घोटाळ्यांची दखल घेऊन नागपूरचा नंबर कटला असावा, अशी शंका व्यक्त करीत महापालिकेला नऊ वर्षातील अकार्यक्षमतेचे सर्टिफिकेट मिळाले असल्याची टीका त्यांनी केली.(प्रतिनिधी)कर किती वाढेल ते आधी सांगाठाकरे म्हणाले, केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटीसाठी अधिक कर भरावा लागेल, असे सूतोवाच केले आहे. आधीच नागपूरकर ओसीडब्ल्यूचे वाढीव पाण बिल, मालमत्ता करात झालेली वाढ, विजेचे अवास्तव बिल यामुळे त्रस्त आहेत. अशात स्मार्ट सिटीच्या नावावर नागपूरकरांवर आणखी एक कर लादला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी करण्यापूर्वी जनतेच्या खिशातील किती पैसे उकळले जातील, त्यांना किती वाढीव कर भरावा लागेल हे आधी जाहीर करावे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने जनमत घ्यावे. त्यानंतरही जनता तयार असेल तरच प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही त्यांनी केली. नासुप्र बरखास्त केल्यास कस्तूरचंद पार्कवर सत्कार स्मार्ट सिटीच्या अपयशाचे खापर नासुप्रवर फोडणे चुकीचे आहे. प्रस्ताव महापालिकेने सादर केला होता. त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची आहे. महापौर नासुप्रच्या बरखास्तीसाठी पाठपुरावा करू म्हणतात. पण आता तर भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. तेतीन दिवसात नासुप्र बरखास्त करू शकतात. राज्य सरकारने खरोखरच नासुप्र बरखास्त करून दाखविली तर आपण भाजप नेत्यांचा कस्तुरचंद पार्कवर सत्कार करू, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.