शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र आणायचे कुठून?

By admin | Updated: June 28, 2015 02:56 IST

शहरातील दहनघाटावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रासाठी महापालिकेने वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

घाटावर अडवणूक : मनपाच्या जाचक अटीनागपूर : शहरातील दहनघाटावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रासाठी महापालिकेने वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. वृद्धत्वामुळे वा अन्य कारणांनी नैसर्गिक मृत्यू झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणे अवघड असल्याने मृताच्या नातेवाईकांपुढे गंभीर समस्या उभी ठाकली आहे. २०१२ मध्ये मनपा प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करताना लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. १ जून २०१५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यापूर्वी मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र वा निवासी असल्याचा पुरावा दिला की मृताच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र मिळत होते.अर्जातील २१ बाबींची पूर्तता केल्यानंतरच मृत्यू प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्वसामान्यांची पिळवणूक नागपूर : नवीन निकषानुसार एखाद्याचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित डॉक्टरांचे प्रमाणपत्र, घरी नैसर्गिक मृत्यू झाला असल्यास वस्तीतील डॉक्टरांचे मृत झाल्याचे प्रमाणपत्र, अपघाती मृत्यू झाला असल्यास पोलीस पंचनामा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर घरी मृत्यू झाला पण मृतावर सहा महिन्यापूर्वी एखाद्या रुग्णालयात उपचार झाले असल्यास संबंधित डॉक्टरांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक करण्यात आले आहे. परंतु सर्वसामान्यांना डॉक्टरांकडून प्रमाणपत्र प्राप्त करणे इतके सोपे नाही. अपघातात मृत्यू झाला असल्यास पोलीस पंचनामा अहवाल सादर करणे म्हणजे सर्वसामान्यांची यात पिळवणूक होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)