शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

कुठे आहे ‘डिजिटल’ भाजप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:49 IST

लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुकांमध्ये विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केल्यानंतर पुढील निवडणुकांसाठी शहर भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देशहर भाजपात दिव्याखालीच अंधार : जिल्ह्यापेक्षा शहर मागेच, साधे संकेतस्थळदेखील नाही

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुकांमध्ये विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केल्यानंतर पुढील निवडणुकांसाठी शहर भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘डिजिटल इंडिया’चा जोरात प्रचार-प्रसारदेखील सुरू आहे. मात्र राज्यपातळीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचे मार्गदर्शन लाभत असलेल्या शहर भाजपमध्ये प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार आहे. ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर पक्ष काहीसा मागासलेलाच असून, शहर भाजपचे साधे संकेतस्थळदेखील तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या नागपूर जिल्हा भाजपने याबाबतीत शहरावर बाजी मारल्याचे चित्र आहे.पदाधिकारीच उदासीनविधानसभा निवडणुकांच्या काळात ‘सोशल मीडिया’वर उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. नागपूर शहरातील विद्यमान आमदारांनीदेखील ‘आॅनलाईन’ प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र केवळ ‘सोशल मीडिया’ वापरणे म्हणजेच तुम्ही ‘डिजिटल’ झाले असे होत नाही. पक्षाची ध्येयधोरणे, इतिहास, शहरातील आतापर्यंतची कामगिरी याची नेमकी व अचूक माहिती एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. याबाबतीत शहर कार्यकारिणीच्या जबाबदार पदाधिकाºयांची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे, असे मत कार्यकारिणीतीलच एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.२०१४ नंतर भाजपचे नेते, कार्यकर्ते ‘सोशल मीडिया’ तसेच इंटरनेटवरील इतर ‘प्लॅटफॉर्म’वर कमालीचे ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले आहेत. भाजपची राष्ट्रीय, प्रदेशपातळीवर स्वतंत्र संकेतस्थळे आहेत. या माध्यमातून पक्षाशी संबंधित विविध घडामोडी जगापर्यंत पोहोचविण्यात येतात. याशिवाय पक्षातील विविध आघाड्या, त्यांचे प्रमुख पदाधिकारी, विविध उपक्रम इत्यादींची इत्थंभूत माहितीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनादेखील पदाधिकाºयांशी संपर्क साधणे सोपे जाते.शहरात भाजपची आतापर्यंतची कामगिरी, सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचे शहर म्हणून वाढलेले महत्त्व, आमदारांची फौज आणि पक्ष विस्ताराचे धोरण लक्षात घेता, पक्षाची सर्व माहिती एका ठिकाणी संकलित असणे अपेक्षित आहे.मात्र शहर भाजपचे अधिकृत ‘टिष्ट्वटर हॅन्डल’देखील नसल्याचे चित्र आहे. संकेतस्थळ तयार करण्यासाठी पावले उचलण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा प्रकल्प मागेच पडला. अद्यापपर्यंत हे संकेतस्थळ सुरूच झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे शहर भाजपमधील ‘सोशल मीडिया टीम’ सक्रिय असतानादेखील हे चित्र आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी भाजपचे शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.नेते सक्रिय, पक्षाचे काय?‘सोशल मीडिया’वर शहर कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी सक्रिय आहेत. काही नेते तर दररोज काही ना काही ‘पोस्ट’ करताना दिसून येतात तर काही सदस्य मंत्र्यांसोबतची छायाचित्रे टाकण्यावर धन्यता मानतात. मात्र वैयक्तिकपणे सक्रियता दाखवीत असताना पक्ष म्हणून एकत्रितपणे ‘डिजिटल’ माध्यमातून जगापर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेण्याची तसदी घेण्याची आवश्यकता पडली नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा ‘अपडेट’ नाहीदुसरीकडे नागपूर जिल्हा भाजपतर्फे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विविध पदाधिकारी, त्यांचा संपर्क, माहिती, पक्षाचा इतिहास इत्यादींची माहिती उपलब्ध आहे. मात्र पक्षाची ध्येयधोरणे, सध्या राबविण्यात येत असलेले उपक्रम याबाबतीत संकेतस्थळ ‘अपडेट’ नाही.