शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाली विद्यापीठाचे घोडे कुठे अडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:02 IST

पाली विद्यापीठाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे पाली भाषेबाबत दुजाभाव का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे२० वर्षांपासूनची मागणी धूळखात दुजाभाव का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाली भाषेचे सांस्कृतिक महत्त्व व वारसा विचारात घेता तसेच महाराष्ट्रात पाली भाषेच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या पाहता पाली भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी मागील २० वर्षांपासून साातत्याने लढा सुरू आहे. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरूआहे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घोषणाही केली. परंतु पाली विद्यापीठाचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे पाली भाषेबाबत दुजाभाव का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्रात तसेच भारतात वेगवगळ्या विद्यापीठांमध्ये पाली भाषेचे अध्ययन केले जाते. भारतीय संस्कृतीत भाषेचे दोन प्रवाह अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक पाली व दुसरी संस्कृत. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने संस्कृतच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. संस्कृतची अनेक विद्यापीठे स्थापन केली आहेत. संस्था स्थापन केल्या आहेत. प्राकृतचे विद्यापीठसुद्धा स्थापन झाले आहे. परंतु पाली भाषेच्या विकासासाठी मात्र एकही स्वतंत्र विद्यापीठ नाही. त्यामुळे पालीचे विद्यापीठ व्हावे, यासाठी पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा व आंदोलने करण्यात आली. शासनदरबारी याची दखल घेण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात पाली विद्यापीठाची घोषणाही केली. परंतु पुढे त्याचे काय झाले काही कळायलाच मार्ग नाही.नागपुरातच व्हावे पाली विद्यापीठपाली विद्यापीठ ही काळाची गरज आहे. अनेक देशांमध्ये पालीचे अध्ययन केले जाते. ही प्राचीन भारतीय भाषा असून तिचे संवर्धन व विकासाची गरज आहे. शासनालाही ही बाब मान्य आहे. राज्याचा विचार केल्यास राज्यात पालीचा अभ्यास करणारे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. यात नागपूर व विदर्भातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. तसेच अनेक विदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यामुळे पाली विद्यापीठासाठी नागपूर हे सर्वोत्तम आहे. यासाठी शासनदरबारी मागणी केली जात आहे. यासोबतच राज्यघटनेच्या शेड्यूल्ड आठमध्ये पाली भाषेचा समावेश करावा, पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, पाली अकादमी स्थापन करावी आदी मागण्याही करण्यात आलेल्या आहेत.-डॉ. बालचंद्र खांडेकर, पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समिती 

 

टॅग्स :literatureसाहित्य