शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात विकासात्मक अभ्यासक्रम आहेत कुठे?

By admin | Updated: June 28, 2015 03:03 IST

‘मिहान’, ‘टेक्सटाईल पार्क’ इत्यादींच्या माध्यमातून नागपूर व विदर्भाला विकासाकडे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

नितीन गडकरींचा सवाल : ‘वायसीसीई’चा पहिला दीक्षांत समारंभ साजरानागपूर : ‘मिहान’, ‘टेक्सटाईल पार्क’ इत्यादींच्या माध्यमातून नागपूर व विदर्भाला विकासाकडे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु येथे येऊ घातलेल्या उद्योगांसाठी पूरक असे अभ्यासक्रमच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नाहीत असे प्रतिपादन करत केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘वायसीसीई’च्या (यशवंतराव चव्हाण कॉलेज आॅफ इंजिनिअरींग) पहिल्या दीक्षांत समारंभाप्रसंगी ते बोलत होते.वानाडोंगरी येथील दत्ता मेघे आॅडिटोरियम येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल, अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ.रवींद्र क्षीरसागर, ‘वायसीसीई’च्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष दत्ता मेघे, आ.समीर मेघे हे प्रामुख्याने उपस्थित होते. शैक्षणिक संस्था व उद्योग जगत यांच्यातील दरी दूर होण्याची आवश्यकता आहे. नागपुरात एअर इंडिया ‘एमआरओ’, मिहान यामुळे रोजगाराच्या संधी आहेत. अमरावतीमध्ये ‘टेक्सटाईल पार्क’ सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु विद्यापीठात ‘टेक्सटाईल इंजिनीअरिंग’ व ‘एव्हिएशन इंजिनीअरिंग’सारख्या शाखाच नाही. अशा स्थितीत येथील विद्यार्थ्यांना रोजगार कसा मिळणार असा प्रश्न उपस्थित करत असे अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना कुलगुरूंना केली. समित्यांवर आधारित प्रशासन विकासाचा वेग कमी करते. विद्यापीठात समित्या खूप आहेत, पण त्यातून बाहेर काही येत नाही. ‘खाया पिया कुछ नही’ अशासारखा हा प्रकार असल्याचा चिमटादेखील त्यांनी यावेळी काढला. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन तरुण अभियंत्यांनी संशोधनावर भर देऊन कमी किमतीत दर्जा कसा वाढेल यावर भर दिला पाहिजे असा सल्लादेखील गडकरी यांनी यावेळी दिला. जागतिकीकरणाच्या या युगात नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज असल्याचे मत डॉ.काणे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.पी.वाघे यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)