शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना वेतन मिळणार कधी?

By admin | Updated: October 27, 2016 02:45 IST

शहरातील राजीव गांधी मूकबधिर व अस्थिव्यंग शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेठीस धरले जात आहे.

मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयात ११ शिक्षक कार्यरतकाटोल : शहरातील राजीव गांधी मूकबधिर व अस्थिव्यंग शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेठीस धरले जात आहे. या शाळेतील काही शिक्षकांना शाळा अनुदानावर येताच कामावरून कमी करून वेतन देणे बंद केले आहे. या शिक्षकांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यापासून तर आंदोलन करण्यापर्यंतचे पर्याय अवलंबले. परंतु, प्रशासन त्यांचा तिढा सोडविण्याकडे लक्ष देत नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.काटोल - कारंजा मार्गालगत सरस्वती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सन १९९५ मध्ये राजीव गांधी मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयात काटोल, नरखेड, कळमेश्वर तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा, छिंदवाडा, मुलताई, प्रभातपट्टण, बैतूल, इटारशी या भागातील विद्यार्थी शिकायला येतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी या विद्यालयात शिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. परंतु, या शिक्षकांना गेल्या २० वर्षांपासून पूर्ण वेतन देण्यात येत नाही. शाळा अनुदानावर येताच त्यांना कामावरून कमी करण्यात आले. परिणामी, या विद्यालयातील बिनपगारी शिक्षकांनी मध्यंतरी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन ही समस्या सोडविण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी ही समस्या न सोडविण्याल्याने या शिक्षकांनी धरणे आंदोलनही केले. तरीही प्रशासनाने या शिक्षकांच्या रास्त मागणीकडे लक्ष दिले नाही. (तालुका प्रतिनिधी) उच्च न्यायालयात मागितली दादसंस्था चालकाच्या मनमानी कारभाराचा त्रास व्हायला लागल्याने काही शिक्षकांनी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त तर एका शिक्षकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाद मागितली. परंतु, या शिक्षकांची नावे हजेरीपटात समाविष्ट करण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर, अस्थिव्यंग विभागातील तीन शिक्षकांना संस्था चालकाकरवी विद्यालयाच्या कार्यालयात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला.