शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आई-बहिणीवरून शिव्यांना कधी लगाम लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:08 IST

- जागतिक महिला दिन : वेब सिरीजमधून अश्लील शिव्यांचा वाहतोय महापूर - नीच वृत्ती संपेल तरच स्त्री उदात्तीकरणाच्या घोषणेला ...

- जागतिक महिला दिन : वेब सिरीजमधून अश्लील शिव्यांचा वाहतोय महापूर

- नीच वृत्ती संपेल तरच स्त्री उदात्तीकरणाच्या घोषणेला येईल महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय संस्कृतीत स्त्रीला ‘विश्वमाता’ म्हटले जाते. तिचे भगिनी रूप मातृत्वाचीच महती गाते. ती सखी आहे, ती सम्राज्ञी आहे, ती जगाला मार्गस्थ करणारी गुरू आहे. मात्र, याच संस्कृतीत त्याच शब्दांच्या नावे शिव्यांची लाखोली वाहण्याचे पातक पुरुष वर्गाकडून सातत्याने होतेय. एकीकडे स्त्री सक्षमीकरणासाठी जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यात महिलांपेक्षा पुरुषच अग्रणी असतात. मात्र, जगभरातील हाच पुरुषवर्ग आपल्या मनाच्या कप्प्यात त्याच स्त्रीविषयी हीन भावना जपतो, ही बाब आई, बहीण व इतर स्त्रीवाचक शिव्यांच्या भडीमारातून स्पष्ट होते. या शिव्या हद्दपार होतील, शिव्या देण्याच्या मनोवृत्तीला लगाम लागेल तरच जागतिक महिला दिन साजरा करण्याला खरा अर्थ राहणार आहे.

रुपेरी पडद्यावर झळकरणारे सिनेमे व दूरचित्रवाणीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांना केंद्रीय प्रमाणन बोर्ड लगाम घालते. बोर्ड सदस्यांची चित्रपट, मालिकांच्या कन्टेन्टवर तीक्ष्ण नजर असते आणि आक्षेपार्ह वक्तव्य आढळताच कात्री लावली जाते. शिव्यांच्या बाबतीत हा नियम कटाक्षाने पाळला जातो. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर झळकणाऱ्या वेब सिरीज, चित्रपट, लघुपट, माहितीपटांसाठी अद्याप कुठलीही प्रमाणन यंत्रणा नाही. या वेब सिरीजमधून सर्रास आया-बहिणींवरून शिव्या प्रसिद्ध होत आहेत. विशेष म्हणजे, अशा शिव्या देण्यात खुद्द अभिनेत्रीच आघाडीवर दिसून येतात. या शिव्यांमध्ये स्त्रीच्या प्रत्येक अंगाचा समावेश असतो. एकीकडे स्त्रीला अबला म्हणून दाखवावे, मानावे. तिच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन उभारावे, अत्याचाराचे वीभत्स चित्रिकरण करावे आणि दुसरीकडे याच समाजाकडून, कलावंतांकडून स्त्रीविषयीच बीभत्स मनोवृत्ती जपावी, हे दुहेरी मापदंड स्त्री उदात्तीकरणाच्या अभियानाला डागाळत आहेत, हे विशेष.

------------

आक्षेपार्ह कन्टेन्टवर गदारोळ, शिव्यांवर का नाही

सिनेमा, वेब सिरीजमधील आक्षेपार्ह कन्टेन्टवर देशभरात प्रचंड गदारोळ माजवला गेला आणि जातोही आहे. मात्र, याच आंदोलकांकडून कधीच आया-बहिणीच्या शिव्यांविरोधात एकही अवाक्षर बोलले जात नाही. एका अर्थाने स्त्री विषयीचे आंदोलनही सोयिस्कर असल्याचेच स्पष्ट होते.

--------------

छत्रपती शिवरायांच्या दरबारात महिलांना सन्मानाने वागणूक मिळायची. आपण दुर्गा, सरस्वती, लक्ष्मीची पूजा करतो. जिजाऊ, सावित्रीच्या नावाचा उदाेउदो करतो. त्याच महाराष्ट्रात स्त्रीवाचक शिव्या दिल्या जातात, ही निंदनीय बाब आहे. महाराष्ट्रासाठी हे लाजिरवाणे आहे. नेटफ्लिक्सवरील वेबसिरीजमध्ये तर पूरच वाहतो. यावर सरकारने निर्बंध लावावे.

- प्रगती पाटील, माजी महिला व बाल कल्याण सभापती, नागपूर महानगरपालिका

फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी

स्त्रीवाचक शिव्याच का

माणूस अथवा स्त्री आपले फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी प्रत्येक वेळी स्त्री वाचक शिव्यांचाच वापर करताना आढळतो. वेब सिरीजमधून तर हा प्रकार सर्रास दिसून येतो. चित्रपट, मालिकांप्रमाणेच वेबसिरीजवरही याबाबत बंधन असणे गरजेचे आहे. पुरुषांनीही स्त्री वाचक शिव्यांना हद्दपार करून माता-भगिनींना सन्मान द्यावा.

- संजय भाकरे, माजी सदस्य, केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्ड, दिल्ली

---------------

..................