शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुपारीचा डब्बा कधी फुटणार?

By admin | Updated: May 28, 2016 02:47 IST

पोलिसांनी तयार केलेल्या डब्यातील सट्टेबाजांच्या यादीत आपलेही नाव असू शकते, अशी भीती असल्याने सडक्या सुपारीवाल्यांनी कारवाई टाळण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे.

नरेश डोंगरे नागपूरपोलिसांनी तयार केलेल्या डब्यातील सट्टेबाजांच्या यादीत आपलेही नाव असू शकते, अशी भीती असल्याने सडक्या सुपारीवाल्यांनी कारवाई टाळण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. त्यांची अस्वस्थता लक्षात घेता सुपारीच्या गोरखधंद्यात गुंतलेल्या एका दलालाने ‘साहाब से बात हो गयी’ म्हणत त्यांना लाखोंची टोपी घातल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, लाखो रुपये घेऊन संबंधित दलाल दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याने सुपारीवाल्यांची स्थिती अडकित्त्यात सापडल्यासारखी झाली आहे. दुसरीकडे सडक्या सुपारीतून बनावट सुगंधित पान मसाला, गुटखा तयार करून लाखो निरपराधांच्या जीवाशी खेळणारे सडक्या सुपारीवाले हजारो कोटींच्या डब्याच्या सट्टेबाजीत गुंतले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुपारीचा डब्बा कधी फुटणार, असा प्रश्न चर्चेला आला आहे. उपराजधानीत सडक्या सुपारीचा गोरखधंदा जोरात आहे. इतवारी, वर्धमाननगर, गांधीबाग, कळमना, खामला, धरमपेठमधील काही गल्लाभरू मंडळी सडक्या सुपारीच्या माध्यमातून लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यांना नामांकित कंपन्यांच्या सुगंधित पान मसाल्याच्या नावाखाली सडक्या सुपारीपासून बनविलेला सुगंधित पान मसाला, गुटखा खाऊ घालून कॅन्सरसारख्या भयावह रोगाच्या जबड्यात ढकलत आहे. नागपुरातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेशमध्येही सडक्या सुपारीचे उत्पादन पाठविले जाते. त्यातून रोज करोडोंची उलाढाल होते. कारवाई टाळण्यासाठी धावपळ नागपूर : कारवाईचे अधिकार असलेली काही भ्रष्ट मंडळी तसेच पोलिसांना लाखोंची मलाई खाऊ घातली जाते. त्यामुळे कोट्यवधींचा हा काळा पैसा संबंधित व्यापारी डब्याच्या धंद्यात गुंतवतात. सडक्या सुपारीच्या गोरखधंद्यात गुंतलेल्यांपैकी बहुतांश जण डब्याच्याही सट्टेबाजीत गुंतले आहेत. गुन्हे शाखेने डब्याचे झाकण उघडल्यापासून सुपारीवाल्यांचे दातही कारवाईच्या भीतीने वाजत आहेत. तीन दिवसांपूर्वी अटकेतील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला गेल्याने डब्यातील सुपारीवाल्यांची अस्वस्थता तीव्र झाली आहे. वरकरणी पोलीस शांत दिसत असली तरी आतमधून बारीक तपास सुरू असल्याची माहिती मिळाल्याने डब्बेबाज सुपारीवाल्यांनी कारवाईचे बालंट टाळण्यासाठी धावपळ चालवली आहे. कोणत्याही स्थितीत कारवाई टाळण्यासाठी सडक्या सुपारीवाल्यांनी या गोरखधंद्यात पुढे असलेल्या अग्रवाल, आनंद, श्याम, ओके, विजय, गणेश आणि अन्य काही जणांना पुढे केले आहे. त्यांनी एका दलालाला हाताशी धरले. (प्रतिनिधी)