शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना न्याय केव्हा मिळणार?

By admin | Updated: December 3, 2015 03:40 IST

सातव्या वेतन आयोगाने सरकारी नोकरदारांचे पगार लाखावर जातील, तर दुसरीकडे मिहानचे प्रकल्पग्रस्त शेतकरी पाच हजाराच्या नोकरीसाठी धडपडत आहेत.

शिवणगावातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा : ४ रोजी सरकारची प्रेतयात्रा काढणारनागपूर : सातव्या वेतन आयोगाने सरकारी नोकरदारांचे पगार लाखावर जातील, तर दुसरीकडे मिहानचे प्रकल्पग्रस्त शेतकरी पाच हजाराच्या नोकरीसाठी धडपडत आहेत. शेतकऱ्यांचे पुनर्वसन करताना त्यांना चारपट फायदा मिळावा, या धोरणाकडे सरकारने कानाडोळा केला आहे. सरकारला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ४ डिसेंबरला सरकारची प्रेतयात्रा काढणार असल्याचा इशारा शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिला.मागण्या १० वर्षांपासून प्रलंबितहिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. गजराज प्रकल्प आणि शिवणगावातील शेतकऱ्यांना शेतीचा वाढीव मोबदला, शहरात १२.५ टक्के विकसित जमीन, घरांचे पुनर्वसन व मोबदला, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी आदींसह अनेक मागण्या तब्बल १० वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि सरकारदरबारी अनेक चकरा मारून शेतकऱ्यांच्या चपला झिजल्या आहेत. आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या प्रेतावर मिहानचा विकास होत असेल तर तो आम्हाला मान्य नाही. न्याय केव्हा मिळणार, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी यावेळी केला.पुनर्वसन याद्यांमध्ये घोळसरकारने पुनर्वसनासाठी तीन याद्या प्रकाशित केल्या. सरकार शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी समजत नाही. सात बारावर नाव असेल तर तोच शेतकरी, अशी त्यांची भूमिका आहे. सरकारने २००६ मध्ये पुनर्वसन केले असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता. सरकार वेळोवेळी निकष बदलत आहे. येथील बहुतांश घरे जीर्ण झाली आहेत. बरीच पडली आहेत. प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमिनीच्या विकासाच्या तीन वर्षांपासून निविदा काढण्यात येत आहे. शिवणगाव, गावठाण, नवे गावठाण, विक्तुबाबानगर येथील शेतकऱ्यांच्या ११६० घरांचा मोबदला हवा आहे. सरकारचा कागदोपत्री होणारा विकास शेतकऱ्यांना मरणाच्या दारात लोटत आहे. न्यायालयाने येथील शेतकऱ्यांसाठी एकरी ५ लाख रुपये वाढीव मोबदला ठरविला आहे. याउलट जयताळ येथील लोकांना एकरी ६० लाख रुपये देण्यात येणार आहे. असा भेदभाव करून सरकार शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. एमएडीसी प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण देते, पण नोकरी देत नाही. मिहान-सेझमध्ये शेतीचे मालक गार्ड आणि चौकीदार झाले आहेत. आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही, असे एमएडीसीचे अधिकारी उत्तरे देतात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांची प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक नाहीपूर्वीचे आमदार आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासोबत काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे. पण त्यांना आमच्या मागण्यांचा विसर पडला आहे. ते उद्योजकांसोबत नियमित बैठका घेतात, पण वर्षभरात प्रकल्पग्रस्तांसोबत एकही बैठक घेतली नाही. मिहान प्रकल्प बोगस असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. गजराज प्रकल्पग्रस्तांचे १९९३ पासून पुनर्वसन झालेले नाही. त्यांना आणि शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांना एकाच भावाने शेतीचा मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.