शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कधी पूर्ण होणार निम्न पैनगंगा प्रकल्प?

By admin | Updated: July 22, 2016 02:58 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार जल संसाधन विभागाचे प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांनी...

शासनाचे मौन : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार जल संसाधन विभागाचे प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांनी निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्पाविषयीच्या प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतु, या प्रतिज्ञापत्रात त्यांनी प्रकल्पाचे काम कधी पूर्ण होणार याची निश्चित माहिती दिलेली नाही. मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास २५ वर्षांचा कालावधी लागतो एवढेच त्यांनी सांगितले आहे. राज्यात सध्या ७२ मोठे, ९७ मध्यम व २८३ लघु सिंचन प्रकल्पाची कामे सुरू आहेत. शासनाने २०१५ मध्ये जारी केलेल्या श्वेतपत्रिकेत सिंचन प्रकल्पांतील गुंतवणुकीला प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पैनगंगा प्रकल्प पाच टप्प्यात पूर्ण करायचा आहे. या प्रकल्पाला १९९७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. यानंतर २०११ मध्ये प्राथमिक कामाला सुरुवात करण्यात आली. धरणविरोधी संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे २०१२ मध्ये प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले. केंद्रीय जल आयोगाने प्रकल्पाला ३१ आॅक्टोबर २०११ रोजी तत्त्वत: मान्यता दिली आहे. शासनाला डिसेंबर-२०१६ पर्यंत डीपीआर सादर करायचा आहे. यानंतर अंतिम मान्यता मिळू शकते असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने गुरुवारी हे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन सुनावणी दोन आठवडे तहकूब केली. यवतमाळ जिल्ह्यातील ताडसावली गावानजीक हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. सुभाष नेमाडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)