शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नाट्य लेखक व्यापक होतील कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:24 IST

९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी नाट्य लेखक व्यापक कधी होणार, असा परखड सवाल उपस्थित केला.

ठळक मुद्देनाट्यलेखन कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकूणच भारतीय नाटके जगाच्या तुलनेत फारच मागे आहेत. त्यातल्यात्यात मराठी नाट्य लेखक अजूनही कुटुंब आणि व्यक्तीमध्येच अडकले आहेत. गांधी, जीना, आंबेडकर, सावरकरांसारख्या महापुरुषांचे अनुयायी म्हणवल्या जाणाऱ्या मराठी समाजात, अजूनही त्यांच्या विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याची धमक नसल्याची भावना व्यक्त करीत ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी नाट्य लेखक व्यापक कधी होणार, असा परखड सवाल उपस्थित केला.नाट्य परिषदेच्या वतीने नंदनवन येथील महिला महाविद्यालयात आयोजित द्विदिवसीय नाट्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे सदस्य शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या वंदना भागडीकर, नाट्य लेखक महेंद्र सुके, पराग घोंगे, डॉ. निलकांत कुलसंगे, नरेंद्र शिंदे उपस्थित होते.लेखकांच्या डोक्यातील आग कधीच कमी होत नाही. मात्र, लेखकांमध्ये रसिकांच्या डोक्याला त्रास देण्याचे कसब असायला हवे. वेदना, जाणीव, नकार, विद्रोह आणि करुणेतून ही क्षमता निर्माण होते. करुणेचा अभाव असेल तर नाटक कधीच पूर्ण होत नसल्याचे गज्वी यावेळी म्हणाले. आपलं नाटक कुटुंबात अडकलं आहे. व्यक्ती, समाज इथपर्यंत एखाद दुसरे लेखक पोहोचले आहेत.मात्र, आता राष्ट्र विरुद्ध राष्ट्र अशी नाट्य लेखकांची व्याप्ती होणे गरजेचे असल्याचे प्रेमानंद गज्वी म्हणाले. संचालन नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीचे उपाध्यक्ष उपक्रम नरेश गडेकर यांनी केले तर आभार प्रकाश एदलाबादकर यांनी मानले.मोदींनी ट्रम्पच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही !काश्मीर प्रश्नावर ट्रम्पने मोदींनी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले. खरे काय ते दोघांनाच ठाऊक़ मात्र, सांगितलंही असेल. कारण, ते राजकारण आहे आणि कुठे काय बोलावे आणि काय नाही, हे ट्रम्प आणि मोदी या दोघांनाही माहीत आहे. मोदींनी दोघांमध्ये काय बातचीत केली, हे सांगण्याची किंवा ट्रम्पच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. राजकारणात पूर्णसत्य कधीच सांगू नये, असे स्वत: डॉ. आंबेडकरांनी सांगितले असल्याचे प्रेमानंद गज्वी यावेळी म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्य