शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची कुचंबणा कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:18 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू आहे. यात उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे

ठळक मुद्देअडीच वर्षात १२ महिला शौचालये: सभागृहातील गोंधळामुळे चर्चा टळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू आहे. यात उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु वर्दळीच्या वा बाजार भागात शौचालयाची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. याचा विचार करता भाजपाचे नगरसेवक निशांत गांधी यांनी सोमवारी सभागृहात शौचालय सुविधाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु बसपाच्या नगरसेवकांनी धुमाकूळ घातल्याने या महत्त्वाच्या विषयावरील चर्चा बारगळल्याने महिलांची होणारी कुचंबणा कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.२०१५ मध्ये शहरातील वर्दळीच्या व मोक्याच्या ५० ठिकाणी महिला शौचालये उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. तत्कालीन उपायुक्त संजय काकडे यांनी ६ एप्रिल २०१५ रोजी न्यायालयात याबाबत शपथपत्र दिले होते. यासाठी जागा अधिग्रहित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्य शौचालये उभारण्यास तयार आहे. शौचालयाची देखभाल, पाणी , वीज व जागा महापालिकेने उपलब्ध करावयाची आहे. परंतु प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या अडीच वर्षात जेमतेम १२ अस्थायी शौचालये उभारण्यात आलेली आहेत. उर्वरित शौचालये कधी उभारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. निशांत गांधी यांच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली असती, तर हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असता.शौचालयाची सुविधा नसल्याने वेळप्रसंगी लघवी वा शौच रोखून धरावी लागते. याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. संसर्गजन्य व मूत्राशयाचे आजार होण्याचा धोका असतो. वास्तविक न्यायालयाच्या निर्देशानुसार बाजार वा वर्दळीच्या भागात प्रत्येकी ५०० मीटर अंतरावर महिला शौचालयांची सुविधा असायला हवी. शौचालयाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक, दर फलक, सेवा मोफत की शुल्क आकारले जाते, याची माहिती असलेले फलक, दिव्यांगांसाठी रॅम्प अशा सुविधांची गरज आहे. शहरात उभारण्यात आलेल्या शौचालयांच्या ठिकाणी या सुविधा नाही. शौचालयातील सुविधा व समस्या मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे. परंतु या समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही.हॉटेलमधील शौचालय वापरण्याला संमतीनागपूर शहराच्या विविध भागात तसेच वर्दळीच्या बाजार भागात हॉटेल्स आहेत. सार्वजनिक शौचालयांची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. हे विचारात घेता हॉटेल्समधील शौचालयांचा महिलांना वापर करता यावा, यासाठी अनुमती मिळण्यासंदर्भात नगसेवक निशांत गांधी यांनी नागपूर रेसिडेंटल हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाºयांशी चर्चा केली. असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी याला सहमती दर्शविली आहे. महिला व युवतींना वेळप्रसंगी गरज भासल्यास हॉटेलमधील शौचालयाचा वापर करता येईल, अशी माहिती निशांत गांधी यांनी दिली. यामुळे शहरातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.