शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उपराजधानीतील ‘हाथरस’ कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:38 IST

Nagpur News, Rape ‘पोक्सो’ अंतर्गत (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफन्सेस) दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये नागपूरचा देशात दहावा क्रमांक आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ ‘पोक्सो’अंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये २०१९ मध्ये देशात दहावा क्रमांक

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणानंतर देशभरातील समाजमन पेटून उठले आहे. महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीतदेखील अल्पवयीन मुली व महिला सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये तर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा आकडा २१ टक्क्यांनी वाढला आहे. ‘पोक्सो’ अंतर्गत (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफन्सेस) दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये नागपूरचा देशात दहावा क्रमांक आहे. एनसीआरबीच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.२०१९ साली नागपुरात ‘पोक्सो’ अंतर्गत एकूण २३१ गुन्हे दाखल करण्यात आले. यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची संख्या १११ इतकी होती. तर ११७ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रयत्न करण्यात आले. २०१८ मध्ये अत्याचाराचा आकडा ९१ इतका होता. तर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्ह्यांची संख्या १९५ इतकी होती.

महिलांविरोधातील गुन्हे कधी घटणार?मागील तीन वर्षांत नागपुरात महिलांविरोधात झालेल्या विविध गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. २०१९ मध्ये १ हजार १४४ प्रकरणे दाखल करण्यात आली व १ हजार १५५ महिलांना विविधप्रकारे अन्यायाचा सामना करावा लागला. यात लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाचे २२२ गुन्हे, अपहरणाच्या ४०५ तर पती किंवा सासरच्यांकडून क्रूरतापूर्ण वागणुकीच्या १३६ गुन्ह्यांचा समावेश होता.

टॅग्स :Rapeबलात्कार