शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांना कधी मिळेल?

By admin | Updated: June 24, 2016 03:00 IST

गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना कधी मिळेल व कालव्यांचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

हायकोर्टाची विचारणा : सिंचन विभागाच्या प्रधान सचिवांना मागितले उत्तरनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना कधी मिळेल व कालव्यांचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य शासनास करून यावर दोन आठवड्यांमध्ये सिंचन विभागाच्या प्रधान सचिवांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत.यासंदर्भात जन मंच या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्याने प्रतिज्ञापत्र सादर करून गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती दिली. यावर याचिकाकर्त्यांचे वकील फिरदोस मिर्झा यांनी आक्षेप घेतला. केवळ पाणी साठवणे म्हणजे प्रकल्प पूर्ण होणे होय काय. शेतकऱ्यांपर्यंत पाणी कधी पोहोचेल असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यावर शासनाने शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कालव्यांचे काम हाती घेतल्याचे सांगितले. या बाबी लक्षात घेता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.सिंचन घोटाळ्यासंदर्भात यापूर्वीही दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. डिसेंबर-२०१४ मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विद्यमान शासनाने सिंचन घोटाळ्याची ‘एसीबी’मार्फत खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ही माहिती न्यायालयाला देण्यात आल्यानंतर १२ डिसेंबर २०१४ रोजी जनहित याचिका निकाली काढण्यात आल्या होत्या. तसेच, भविष्यात आवश्यकता वाटल्यास पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आली होती. यानंतर संस्थेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला वेळोवेळी पाच तक्रारी सादर करून सिंचन घोटाळ्यासंदर्भात १० हजारावर कागदपत्रे दिली. परंतु, चौकशीत विशेष प्रगती झाली नाही. यामुळे संस्थेने दुसऱ्यांदा हायकोर्टात धाव घेतली आहे. महामंडळातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)