शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बार्टीच्या जेईई, नीट प्रशिक्षणाचा मुहूर्त कधी निघणार; हजारो विद्यार्थी प्रशिक्षण सुरु होण्याच्या प्रतीक्षेत

By आनंद डेकाटे | Updated: June 6, 2025 21:27 IST

दहावीचा निकाल लागून महिना झाला

नागपूर - दहावीचा निकाल लागून महिना होत आला आहे. परंतु बार्टीतर्फे देण्यात येणाऱ्या जेईई व नीटच्या मोफत प्रशिक्षणाला अद्याप सुरूवात झालेली नाही. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाशी संबंधित असल्याने ते वेळेत सुरू होणे अपेक्षित आहे. हजारो मागासवर्गीय विद्यार्थी या प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असून त्याचा मुहुर्त कधी निघणार असा प्रश्न विचारला जात आहे.

दहावीच्या निकाल लागताच पालक व विद्यार्थी जेईई व नीटच्या तयारीला लागतात. त्यादृष्टीने इतर खाजगी संस्थामधे प्रशिक्षणाला एप्रिल महिन्यातच सुरुवात झाली आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या शेकडो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते खाजगी प्रशिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्यासाठी बार्टी मोठा आधार आहे व ते या प्रशिक्षणच्या आतुरतेने प्रतिक्षेत आहेत. प्रशिक्षण घेऊन हे गुणवंत विद्यार्थी देशातील नामांकित आयआयटी, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालय मध्ये प्रवेश प्राप्त करू शकतात. या वर्षीच्या प्रशिक्षणाला खूप जास्त विलंब होत असल्यामुळे शेकडो अनुसूचित जातीच्या विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. वर्ग १० वी चा निकाल लागून बरेच दिवस झाल्यामुळे विद्यार्थी व पालकाकडून बार्टीच्या अधिकृत प्रशिक्षण संस्थांमध्ये यावर्षीचे प्रशिक्षणाबाबत सातत्याने विचारणा होत आहे. ...तर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसानप्रशिक्षणाबाबत बार्टी कार्यालयामध्ये विद्यार्थी पालक दररोज विचारणा करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बार्टीद्वारे यावर्षी नवीन निविदा प्रक्रिया राबवणार असून त्यानंतर प्रशिक्षण सुरु होणार आहे. नवीन निविदा प्रक्रियेला किमान ५ ते ६ महिन्याचा कालावधी लागू शकतो. परिणामी विद्यार्थांचा अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर्षी बार्टीच्या जेईई साठी ४१९ प्रशिक्षणार्थी होते त्यापैकी जेईई मेन्समध्ये ९४ तर जेईई अडव्हान्समध्ये १९ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. वेळेवर प्रशिक्षण मिळाल्याने हे शक्य झाले. चांगला निकाल असताना प्रशिक्षणास विलंब होत असेल तर अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांवर बार्टी प्रशासनाद्वारे जाणीवपूर्वक अन्याय करण्यात येत आहे, असे दिसून येईल. म्हणून विषयाची गंभीरता लक्षात घेत बार्टीने लवकरात लवकर प्रशिक्षण सुरु करावे. - आशिष फुलझेले, सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच