शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी परिषद निवडणुका कधी?

By admin | Updated: September 1, 2014 01:07 IST

सप्टेंबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर ‘नॅक’ समितीचा दौरा तसेच शंभराव्या दीक्षांत समारंभाचे आव्हान आहे. विद्यापीठातर्फे यासाठी जोरदार तयारी सुरू असली

नागपूर विद्यापीठ : निवडणूक अधिसूचनेची अद्यापही प्रतीक्षानागपूर : सप्टेंबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर ‘नॅक’ समितीचा दौरा तसेच शंभराव्या दीक्षांत समारंभाचे आव्हान आहे. विद्यापीठातर्फे यासाठी जोरदार तयारी सुरू असली तरी या गडबडीत दरवर्षी होणाऱ्या विद्यार्थी परिषद निवडणुकांसंदर्भात नागपूर विद्यापीठात अद्यापपर्यंत कुठलीही हालचाल दिसून आलेली नाही. निवडणुकांची तारीख अद्याप घोषित झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मागील वर्षीदेखील प्रवेशबंदीच्या मुद्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका विलंबाने झाल्या होत्या. विद्यार्थी संघटनांनी यासंदर्भात मौन धारण केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.साधारणत: दरवर्षी आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाविद्यालय विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतात. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थी परिषदेची घोषणा करण्यात येते. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत तर सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होते व साधारणत: आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतात. यातून विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष व सचिवाची निवड करण्यात येते. परंतु यंदा महाविद्यालये सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु अजूनपर्यंत अधिसूचना जारी झालेली नाही. विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागातर्फे अद्यापपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रमच घोषित झालेला नाही. महाविद्यालय विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका लांबल्या तर त्याचा परिणाम विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडीवर पडेल.(प्रतिनिधी)