शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीसाठी स्पेशल ट्रेनची घोषणा कधी?

By admin | Updated: October 12, 2015 02:44 IST

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून बौद्ध बांधव नागपुरात दीक्षाभूमीवर येतात.

सोहळा नऊ दिवसावर : लवकर निर्णय घेण्याची गरजनागपूर : दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून बौद्ध बांधव नागपुरात दीक्षाभूमीवर येतात. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करते. परंतु हा सोहळा अवघा नऊ दिवसांवर आलेला असताना अद्यापही रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नागपुरात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दरवर्षी देशभरातून हजारो भाविक येतात. त्यामुळे या काळात चारही दिशांनी येणाऱ्या रेल्वेगाड्यात प्रचंड गर्दीचे चित्र पाहावयास मिळते. यात मुंबईकडून असंख्य भाविक नागपुरात येतात. मुंबई मार्ग आधीच वर्षभर व्यस्त राहतो. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासन पुढाकार घेऊन विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करीत असते. परंतु या वर्षी धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा सोहळा नऊ दिवसांवर येऊन ठेपला असताना रेल्वे प्रशासनाने अद्याप विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केलेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष गाड्यांची घोषणा केल्यानंतर आणि त्याबाबतची प्रसिद्धी प्रसारमाध्यमात झाल्यानंतर त्याबाबतची माहिती प्रवाशांना कळते. त्यानंतर ते या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये आपले आरक्षण करतात. एकीकडे रेल्वे प्रशासन योग्य दराचे तिकीट काढून प्रवास करा, असा आग्रह धरते आणि दुसरीकडे ऐनवेळी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करते. रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी लवकर विशेष रेल्वेगाड्या जाहीर करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)