शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शहीद भगतसिंगांचा पुतळा कधी?

By admin | Updated: August 9, 2014 02:28 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब टाकून इंग्रज राजवटीला हादरविणारे, देशासाठी हसतहसत फासावर जाणारे, महान क्रांतिकारक भगतसिंग यांचा नागपूरच्या प्रशासनाला विसर पडला आहे.

मंगेश व्यवहारे नागपूरस्वातंत्र्यपूर्व काळात सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब टाकून इंग्रज राजवटीला हादरविणारे, देशासाठी हसतहसत फासावर जाणारे, महान क्रांतिकारक भगतसिंग यांचा नागपूरच्या प्रशासनाला विसर पडला आहे. प्रशासनाने भगतसिंगच्या पुतळ्यासाठी जागा देण्यास इन्कार केल्याने, घंटानादचे संस्थापक बाबा शेळके यांनी घरातच पुतळ्याची स्थापना केली आहे.युवकांनी भगतसिंगच्या शौर्याची प्रेरणा घ्यावी, या भावनेतून ‘घंटानाद’ चे संस्थापक बाबा शेळके यांनी विजय टॉकीज जवळील शहीद भगतसिंग चौकात पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. २००६ पासून त्यांनी पुतळ्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. पुतळ्याच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या विभागाची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही विभागाने उत्तर दिले नाही. त्यामुळे २३ मार्च २००७ रोजी प्रशासनाला न जुमानता भगतसिंग यांचा पुतळा स्थापण्याचा निर्णय घेतला. ६४००० रुपये खर्च करून त्यांनी भगतसिंग यांच्या पुतळ्याची निर्मिती केली. त्यासाठी विजय टॉकीजच्या चौकात चबुतरा बांधला. पुतळ्याच्या स्थापनेसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला माजी खासदार विलास मुत्तेमवार, आमदार दीनानाथ पडोळे, भगतसिंग यांचे सहकारी काकासाहेब पापरीकर, रामकृष्णदादा बेलूरकर बोलाविले. मात्र ऐन कार्यक्रमात गणेशपेठ पोलिसांनी एक नोटीस बजावून पुतळ्याच्या स्थापनेला विरोध केला. त्यामुळे हा कार्यक्रम खंडित झाला. त्यानंतर बाबा शेळके यांनी पालकमंत्री, नगरविकास मंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, महापौर, यांना वारंवार निवेदन, धरणे आंदोलन केले. मात्र कुणीच दखल घेतली नाही. शेवटी शेळके यांनी आपल्या घरातच भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्थापना केली. आता भगतसिंग यांच्या जयंतीला, पुण्यतिथीला, स्वातंत्र्यदिनाला आणि गणराज्य दिनाला ते घरीच कार्यक्रम करतात. प्रशासन नियोजित स्थितीत जोपर्यंत हा पुतळा बसवित नाही, तोपर्यंत त्यांचा संघर्ष सुरू राहणार आहे.