कामाचा ताण वाढला : सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णयदयानंद पाईकराव नागपूर सहा महिन्यासाठी भुसावळ डिव्हीजनला पाठविलेले लोकोपायलट तीन वर्षे होऊनही नागपूर विभागात परतले नाहीत. यामुळे नागपूर विभागात २५० लोकोपायलटची पदे रिक्त झाली असून कार्यरत लोकोपायलटवर कामाचा ताण वाढला आहे. त्यांना सुट्या मिळणे बंद होऊन, ओव्हरटाईम करावा लागत आहे. याचा परिणाम सुरक्षेवर होत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भुसावळला पाठविलेले लोकोपायलट त्वरित परत बोलविण्याची मागणी होत आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १२७ लोकोपायलट जून २०१२ मध्ये ६ महिन्यांच्या कालावधीसाठी भुसावळ विभागात पाठविण्यात आले. परंतू जून २०१५ पर्यंत हे लोकोपायलट भुसावळ विभागाने नागपूर विभागाला परत केले नाहीत. सध्या नागपूर विभागात २५० लोकोपायलटची पदे रिक्त झालेली आहेत. यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. यामुळे एखाद्या लोकोपायलटच्या हातून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भुसावळला पाठविलेले लोकोपायलट परत बोलविण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. गार्डची पदेही रिक्तचविभागात गार्डची एकून ५६० मंजूर पदे असून त्यातील ११० पदे रिक्त आहेत. त्यामुळे गार्डला सुट्या मिळत नसून त्यांनाही लोकोपायलटप्रमाणे ओव्हरटाईम करावा लागत आहे. रेल्वे प्रवासात लोकोपायलटप्रमाणे गार्डचे महत्त्वही खूप आहे. परंतु गार्डची पदेही रिक्त असल्यामुळे ही पदे त्वरीत भरण्याची गरज निर्माण झाली आहे.अधिकाऱ्यांची पदे भरतात त्वरितमध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकाही अधिकाऱ्याचे पद रिक्त नाही. एका अधिकाऱ्याचे पद रिक्त असले की त्याच्या कामाचा चार्ज दुसऱ्या अधिकाऱ्यावर येतो. त्यामुळे अधिकाऱ्याचे पद रिक्त असले की ते पद भरण्याला त्वरित प्राधान्य देण्यात येते. परंतु कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची तसदी कोणीच घेताना दिसत नाही.
लोकोपायलटची घर वापसी कधी ?
By admin | Updated: June 1, 2015 02:41 IST