शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गुगुलडोहचा विकास कधी?

By admin | Updated: August 15, 2016 02:00 IST

रामटेक तालुक्यातील गुगुलडोह या गावात आदिवासीबांधव वास्तव्याला आहेत. या गावात पिण्याच्या पाण्यापासून

पथदिव्यांची वानवा : गढूळ पाण्यावर भागवावी लागते तहान महादुला (रामटेक) : रामटेक तालुक्यातील गुगुलडोह या गावात आदिवासीबांधव वास्तव्याला आहेत. या गावात पिण्याच्या पाण्यापासून तर पथदिव्यांपर्यत विविध समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामुळे येथील नागरिकांना रोज संकटांचा सामना करावा लागतो. परिणामी, या गावाचा विकास कधी होणार, असा मूलभूत प्रश्न स्थानिक गा्रमस्थांनी उपस्थित केला आहे. गुगुलडोह येथील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागावी म्हणून काही वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पांतर्गत गावाच्या शेजारी विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही. गावात पिण्याच्या पाण्याची प्रभावी सुविधा नसल्याने स्थानिक नागरिकांना याच विहिरीतील गढूळ पाणी प्यावे लागते. परिणामी, स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका उद्भवण्याची किंबहुना गावात साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील रस्त्यांच्या कडेला विजेचे खांब रोवण्यात आले आहेत. परंतु, कोणत्याही खांबावर विजेचे दिवे लावण्यात आले नाही. त्यामुळे सदर खांब केवळ गावाच्या सौंदर्यात भर टाकत आहे. गुगुलडोह गाव जंगलालगत असल्याने तसेच गावात रात्रीच्यावेळी प्रकाशाची सोय नसल्याने नागरिकांना अंधारात मार्गक्रमण करीत घर गाठावे लागते. जंगलामुळे या भागात साप व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. या प्राण्यांपासून नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यताही बळावली आहे. गावालगतच्या वन विभागाच्या नाल्यापासून गावापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम करण्यात आले. या रोडच्या दोन्ही बाजूंनी मुरूम टाकण्यात आला नाही. गावापासून तर जिल्हा परिषदेच्या तलावापर्यंतच्या पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. यात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याने अल्पावधीतच या रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. त्याचाही त्रास नागरिकांनाच सहन करावा लागत आहे. गुगुलडोह ते मुसेवाडी या रोडच्या दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. या मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुलाला सिमेंटचे पाईप लावण्यात आले नाही. गावात सांडपाणी वाहून जाण्याची प्रभावी सोय नाही. गावातील सांडपाणी गावातच जमा होत असून, त्यात डासांची पैदास होत आहे. त्यामुळे नागरिकांना मलेरिया व तत्सम आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाच्या हागणदारीमुक्त गाव योजनेंतर्गत गावातील काही नागरिकांना वैयक्तिक शौचालये मंजूर करण्यात आली. यातील ३९ शौचालयांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सदर बांधकाम कासवगतीने सुरू आहे. (वार्ताहर) शासकीय आरोग्यसेवा कुचकामी गावात आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राच्या समोर असलेल्या नालीत सिमेंटचा मोठा पाईप टाकण्यात आला असून, हा पाईप वर्षभरापासून फुटलेला आहे. हा पाईप बदलविण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. या उपकेंद्रात आरोग्यसेविकेची नियुक्ती करण्यात आली असून, आरोग्यसेविका कधीच उपकेंद्रात हजर राहात नाही. त्यामुळे त्या मुख्यालयी राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिणामी, नागरिकांना शासकीय आरोग्य सेवेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने या उपकेंद्रात स्थायी आरोग्य सेविकेची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या गावातील शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरली आहे. स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी गुगुलडोह गावाचा समावेश पंचाळा गटग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आला आहे. गुगुलडोह ते पंचाळा हे अंतर चार कि.मी. आहे. गुगुलडोहची लोकसंख्या एक हजाराच्या वर आहे. या गटग्रामपंचायतचे बहुतांश पदाधिकारी पंचाळा येथील रहिवासी असल्याने ते गुगुलडोहच्या विकासाकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोपही केला जात आहे. परिणामी, या गावात पिण्याच्या पाण्यापासून तर पथदिव्यापर्यंतच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. विजेच्या खांबावर दिवे लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीची मागणी जोर धरत आहे.