शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तुकडोजी अध्यासनातील अभ्यासक्रमाला ‘यूजीसी’ची मान्यता कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाबाबत प्रशासनाची अनास्था अद्यापही कायम असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाबाबत प्रशासनाची अनास्था अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. राष्ट्रसंतांच्या नावाने सुरू असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदान मिळणे शक्य आहे. यासाठी आयोगाची मान्यता आवश्यक आहे. मात्र त्यासाठी विद्यापीठाकडून अद्यापही पुढाकार घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पदव्युत्तर पदवीनंतर तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर संशोधन करणे शक्य होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे.

तुकडोजी महाराजांच्या अनुयायांच्या अथक प्रयत्नांनी अध्यासन सुरू तर झाले. मात्र सुरुवातीपासूनच अध्यासनाबाबत विद्यापीठाने हवा तसा पुढाकार घेतला नाही. अनुयायांनी वारंवार प्रयत्न केल्यानंतर अखेर या अध्यासनाबाबत प्रचार-प्रसार करण्यात आला व मग विद्यार्थी मिळण्यास सुरुवात झाली. या विभागात सुरू असलेला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हा रोजगाराभिमुख नाही. त्यामुळे याकडे तरुणांची पावले वळत नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांची देशाला व समाजाला आवश्यकता आहे. याकडे तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात यावे व त्यांचे विचार आत्मसात करावे, या उद्देशातून येथे संशोधनाचीदेखील आवश्यकता आहे. परंतु अध्यासनातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यापीठ अ़नुदान आयोगाची मान्यता नाही. यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासमंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर रक्षक व इतरांनी २०१८ साली विद्यापीठाला निवेदन दिले होते. त्यानंतर वारंवार यासंदर्भात विद्यापीठाला आठवण करून देण्यात आली. मात्र विद्यापीठाने ना पुढाकार घेतला ना प्रस्ताव तयार करण्याची तसदी घेतली. विद्यापीठाला ‘नॅक’चा अ दर्जा मिळाला आहे. आता कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वत: पावले उचलावी व राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा एम.ए. अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता मिळवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावी, अशी मागणी रक्षक यांनी केली आहे.