शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ का क्या होगा?

By admin | Updated: July 26, 2014 02:56 IST

लोकसभा निवडणुकांत संपूर्ण देशात ताकदीनिशी

कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग : सुरुवातच चुकीची झाल्याची भावनानागपूर : लोकसभा निवडणुकांत संपूर्ण देशात ताकदीनिशी उतरणाऱ्या ‘आप’ने (आम आदमी पार्टी) महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका न लढण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा झाली नव्हती. परंतु सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीमुळे उपराजधानीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. ‘आप’ची सुरुवातच चुकीच्या ‘ट्रॅक’वर झाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.उपराजधानीत लोकसभा निवडणुकांच्या काळात ‘आप’ने चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. अंजली दमानियांना ‘आऊटसोर्स’ करून उपराजधानीत उमेदवारी देण्यात आली होती व येथील लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. परंतु लोकसभेच्या निकालानंतर ‘आप’ला अक्षरश: भगदाड पडले व अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. परंतु सुरुवातीपासून ‘आप’सोबत एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. काही जणांनी आपापल्या पातळीवर तयारीदेखील सुरू केली होती. परंतु हरियाणा येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक न लढण्याबद्दलचा निर्णय जवळपास अंतिम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित वृत्त उपराजधानीतील कार्यकर्त्यांपर्यंतदेखील पोहोचले अन् अनेक जणांचा अपेक्षाभंग झाला.‘आप’चे संयोजक देवेंद्र वानखडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप ठोस सूचना आल्या नसल्याचे स्पष्ट केले. परंतु निवडणुका लढणार नाही असे संकेत मिळाले असल्याचे मात्र त्यांनी मान्य केले. पक्षाने स्थानिक पातळीवरील निवडणुकांपासून सुरुवात करायला हवी होती. यंदा जरी निवडणुका लढल्या नाहीत तरी संघटन बांधणीचे काम करण्यावर जास्त भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ‘ट्रॅक’च चुकलायासंदर्भात ‘आप’च्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता बहुतांश कार्यकर्त्यांनी पक्षाचा ‘ट्रॅक’च चुकला असल्याचे मत व्यक्त केले. नवीन पक्षाने सुरुवातीला संघटन बांधणीवर जास्तीत जास्त भर देण्याची गरज असते. परंतु ‘आप’ने स्थानिक स्तरांवरील निवडणुका न लढता थेट लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकांत उडी घेतली. केजरीवाल लाटेमुळे कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह होता, परंतु तो तेवढ्या काळापुरता मर्यादित होता. निवडणुकांनंतर आता पक्षाचे संघटनच कोसळले आहे, असे कार्यकर्ते म्हणाले.