शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सातबारावर कशा होणार नोंदी ?

By admin | Updated: April 4, 2015 02:28 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या परंतु सातबारावर नोंदी नसलेल्या जनपदकालीन जमिनी हस्तांतरित

जिल्हा परिषद : शोध घेऊ नही जमिनीची कागदपत्रे सापडेना नागपूर : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या परंतु सातबारावर नोंदी नसलेल्या जनपदकालीन जमिनी हस्तांतरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामविकास विभागाने दोन वर्षापूर्वी घेतला. परंतु ग्रामविकास व महसूल विभागाच्या वादात सातबारावर जि.प.च्या नावाची नोंद करण्याची प्र्रक्रिया थांबली आहे. जि.प.च्या निर्मितीनंतर सोबतच जनपदकालीन जमिनीची मालकी मिळणे अपेक्षित होते. परंतु सातबारावर फेरफार न झाल्याने जि.प.ला अनेक जागांचा कायदेशीर मालकी हक्क अद्याप मिळालेला नाही. अशा जागांचा शोध घेऊ न सातबारावर नाव चढविण्यासाठी प्रशासनाने तीन वर्षापूर्वी मोहीम घेतली होती. ग्रामविकास विभागाच्या निर्णयानंतर याला गती येण्याची अपेक्षा होती. परंतु महसूल विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ही मोहीम थंड पडल्याचे चित्र आहे.रेकॉर्डनुसार जिल्ह्यातील १११ जमिनी ताब्यात असणे अपेक्षित असताना ७२ जागा जि.प.च्या मालकीच्या आहेत. ३३ जागा अद्याप जनपदच्या नावावर आहेत. इतर जागाचा रेकॉर्ड अप्राप्त आहे. २९ जानेवारी २००४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद, पंचायत समित्ी व ग्रामपंचायत यांच्याकडील स्थावर मालमत्तेचे अधिलेख तयार करणे व अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. परंतु तांत्रिक बाबींमुळे जमिनीचे फेरफार अडकले आहे.शहरात जि.प.च्या मालकीच्या बडकस चौक, झिंगाबाई टाकळी , वर्धा मार्गावरील साईमंदिर लागत, भामटी परसोडी, सुभाषनगर, हिंगणा रोड, पटवर्धन हायस्कूल आदी जागा मोक्याच्या ठिकाणी आहेत. सोन्याचा भाव असलेल्या यातील काही जागावर अतिक्र मण झालेले आहे. परसोडी येथील १३ एक रपैकी काही जागेवर अतिक्र मण झाले आहे. हिंगणा मार्ग व झिंगाबाई टाकळी येथील जागेच्या काही भागात अतिक्र मण आहे. (प्रतिनिधी)क से वाढणार उत्पन्नजिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी जि.प.च्या उत्पन्नात वाढ करण्यावर सभागृहात चर्चा होते. परंतु पदाधिकारी व अधिकारी फारसे गंभीर दिसत नाही. काही सभापतींना अद्याप विभागाच्या योजनांचीच माहिती नाही. अशा परिस्थितीत उत्पन्नात वाढ कशी होणार, असा प्रश्न अभ्यासू सदस्यांना पडला आहे.