शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

लोकांना करात काय बदल हवा : जेटली यांचा चर्चेदरम्यान प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:44 IST

माजी केंद्रीय वित्तमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनावर नागपूरचे वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट जुल्फेश शाह यांनी त्यांच्याशी जुळलेल्या काही आठवणी ताज्या करताना ते एक दूरदृष्टी असणारे ज्ञानसंपन्न नेते होते, अशी भावना व्यक्त केली.

ठळक मुद्देसीए जुल्फेश शाह यांनी आठवण केली ताजी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माजी केंद्रीय वित्तमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनावर नागपूरचे वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट जुल्फेश शाह यांनी त्यांच्याशी जुळलेल्या काही आठवणी ताज्या करताना ते एक दूरदृष्टी असणारे ज्ञानसंपन्न नेते होते, अशी भावना व्यक्त केली.शाह यांनी सांगितले की, अरुण जेटली भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी डिसेंबर २०१३ मध्ये नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांच्याशी भेटीचा योग आला. तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अरुण जेटली यांच्याशी भेट घडवून आणली होती. त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था आणि कायद्याशी जुळलेल्या विविध मुद्यांवर जेटली यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली होती. जेटली यांचे व्हिजन आणि कायदा व आर्थिक ज्ञान दूरदृष्टी देणारे असल्याचे चर्चेतून स्पष्ट झाले होते.चर्चेदरम्यान जेटली यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आयकर प्रणाली कशा प्रकारची असावी, त्यात लोकांना काय बदल हवे आहेत, लोकांची प्रतिक्रिया काय आहे, आदी प्रश्न त्यांनी विचारले होते. या प्रश्नांवर त्यांचे विचार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. चर्चेदरम्यान जेटली यांच्याकडून अनेक बाबी शिकायला मिळाल्याचे शाह यांनी सांगितले. नवी दिल्लीत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटच्या एका समारंभात जेटली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते देशाचे वित्तमंत्री होते. त्यावेळीही जेटली यांच्या भेटीची आठवण ताजी करताना शाह यांनी जेटली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीchartered accountantसीए