नागपूर : स्टार बसची दुरवस्था झाली आहे. शहरातील प्रवाशांनाही याची जाणीव आहे. मनपा सभागृहात यावर अनेकदा वादळी चर्चा झाली. वर्षभरापूर्वी नवीन बस आॅपरेटरची नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. परंतु अद्याप या संदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याने प्रशासन व पदाधिकाऱ्यांची स्टारवर कृ पादृष्टी कशासाठी असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. स्टार बस आॅपरेटर वंश निमय यांच्याकडून मनपाला कोणत्याही स्वरुपाची रॉयल्टी मिळत नाही. दुसरीकडे प्रवासी तिकिटावरील कर व पोषण आहार कर न भरल्याने परिवहन विभागाने ८.३३ कोटीची थकबाकी काढली आहे. या संदर्भात मनपा प्रशासनाला परिवहन विभागाने पत्र दिले आहे. परंतु प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. थकबाकी भरण्यासंदर्भात नोटीस बजावल्यानंतरही वंश निमय यांनी याला उत्तर दिलेले नाही. असे असतानाही प्रशासन व पदाधिकारी गप्प आहेत. परिवहन विभागाने स्टार बस जप्त केल्यानंतर परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त सोमवारी दिवसभर बस जप्त करण्यामागील कारणांचा शोध घेत होते. परंतु आॅपरेटरने कोणत्याही स्वरुपाची धावपळ केली नाही. फुटलेल्या काचा, बंद इंडिकेटर व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने परिवहन विभागाने मंगळवारी १६ बसेस जप्त केल्या. (प्रतिनिधी)थकबाकीवर अनुत्तर८.३३ कोटीची थकबाकी असूनही मनपाची वंश निमय यांच्यावर कृ पादृष्टी कशासाठी असा प्रश्न केला असता बंडू राऊ त निरुत्तर झाले. या संदर्भात महापौर प्रवीण दटके यांना विचारणा केली असता या रकमेचे समायोजन राज्य सरकारकडून मिळणाऱ्या रकमेतून केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. परंतु त्यांनी आॅपरेटरच्या विरोधात कठोर कारवाई संदर्भात कोणतेही संकेत दिले नाही.
स्टारवर कृपादृष्टी कशासाठी ?
By admin | Updated: August 11, 2015 03:43 IST